sulakshana wife of goa cm pramod sawant it is called husband s power house Dainik Gomantak
गोवा

Sulakshana Sawant: इंधन दरवाढीवर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काँग्रेसला दिला 'हा' सल्ला

इंधनाच्या जागतिक दरांकडे दाखवले बोट

Akshay Nirmale

Sulakshana Sawant: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रूपये तर व्यावसायिक गॅस सिलिंडदरच्या दरात 250 रूपये वाढ या महिन्याच्या सुरवातीलाच झाली होती. तेव्हापासून आधीच महागाईचे चटके बसत असलेल्या सर्वसामान्यांमधून चिंता व्यक्त होत आहेत.

यामुळे गृहिणींचे बजेटही बिघडले आहे. याच विषयावर आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नीचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुख्यमंत्री सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत म्हणाल्या की, इंधन दरवाढ हा जागतिक विषय आहे. तो कुठल्याही पक्षाच्या हातात असलेला विषय नाही. भारताला पेट्रोलियम उत्पादने इतर देशांतून आयात करावी लागतात आणि देशांतर्गत पेट्रोल-डीझेलचे दर आंतरराष्ट्रीय दरांनुसार ठरतात.

आंतरराष्ट्रीय दरानुसारच भारतातही दरवाढ होत असते. त्यानुसार गोव्यातही गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे, त्याला काहीही करता येत नाही इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यास काँग्रेसला कुणी रोखलेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरांवरून पेट्रोल-डीझेल किंवा इतर पेट्रोलियम उत्पादनांचे दर ठऱत असतात. जगातील ठराविक देश सोडल्यास खनिच तेल किंवा नैसर्गिक वायूचे साठे आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.

त्यामुळे या पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी या देशांकडून होत असलेल्या आयातीवर जगभरातील अनेक देश अवलंबून असतात. साहिजकच देशांच्या अर्थव्यवस्थांवर त्याचा मोठा प्रभाव पडत असतो.

आणि सरतेशेवटी इंधन दरात वाढ झाली की आपुसकच त्याचा परिणाम इतर वस्तुंच्याही दरवाढीत होतो आणि महागाईचा चटका बसत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT