CM Pramod Sawant  twitter
गोवा

Sand Extraction: ‘त्या’ उपसलेल्या रेतीचा होणार लिलाव : सावंत

Sand Extraction: दिलायला लोबो यांच्या प्रश्‍नावर उत्तर

दैनिक गोमन्तक

Sand Extraction: नदीतून गाळ काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या रेतीउपशानंतर ती रेती परत खोल समुद्र किंवा नदीत फेकली जाणार नाही. अशा रेतीचा लिलाव पुकारून ती विकली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. लोबो म्हणाल्या, शापोरा नदीच्या मुखाजवळ वाळूचा पट्टा तयार होतो. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाताना आणि येताना भरतीची प्रतीक्षा करावी लागते.

नदीच्या मुखाजवळील वाळूचा पट्टा दरवर्षी हटवावा लागणार आहे. पावसाळ्यात हा पट्टा तयार होतो. तो काढण्यासाठी बंदर कप्तान खात्याने कार्यवाही केली पाहिजे. खात्याकडे त्यासाठी यंत्रणा आहे त्याचा वापर करता येईल.

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांंनी रेतीचा पट्टा हटवण्यासाठी फेब्रुवारीत नव्हे तर सप्टेंबरमध्ये निविदा काढण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, आता मार्चमध्ये काम होईल आणि पुन्हा जूनमध्ये पट्टा तयार होईल. ते टाळण्यासाठी पाऊस संपल्या संपल्या कामासाठी निविदा काढली पाहिजे.

बंदर कप्तान खात्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा म्हणाले, गाळ साचला आहे. सर्वेक्षणातून त्याची पुष्टी केली आहे. ७ फेब्रुवारीला निविदा मागवली आहे.

20 रोजी ती उघडणार. सर्वसामान्य गाळ उपसण्यासाठी ती निविदा आहे. नियमित गाळ काढावा लागतो, हे खरे आहे. तशी व्यवस्था करावी लागेल.

त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, रेती काढल्यावर ती परत समुद्रात किंवा नदीत फेकण्याची निविदेत तरतूद असेल तर त्यात बदल करावा लागेल. रेती परत फेकून चालणार नाही तर तिचा लिलाव करून ती विकली जावी. यामुळे लोकांना कामांसाठी रेतीही मिळेल आणि खात्याला महसूलही मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Market: '..तर पालिकेसमोर मासे विकू'! वास्कोतील विक्रेत्यांचा पवित्रा; अन्यत्र मासळी विक्री बंदी, सायबिणीच्या स्थापनेची मागणी

Goa coastal survey: गोवा मुक्तीनंतरचे सर्वात मोठे सर्वेक्षण! किनारी भागांत धास्ती; बेकायदा बांधकामांवर होणार कारवाई

GCA: अखेर विषय संपला! रोहन गावस देसाईच ‘जीसीए’चे प्रतिनिधी; BCCI निवडणुकीसाठी शिक्कामोर्तब

Arambol: वृक्षतोड नाही, झाडी कापली! वन खात्याचा हास्यास्पद दावा; हरमलमध्ये संतापाची लाट

Goa Crime: बनावट ग्राहक पाठवला, सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; मास्टरमाईंडला बेळगाव येथून अटक

SCROLL FOR NEXT