CM Pramod Sawant On Ponda Water Supply Issue Dainik Gomantak
गोवा

Ponda Water Supply Issue: पाण्‍याची समस्‍या आठ दिवसांत सोडवा, अन्‍यथा त्रासात पडाल! मुख्‍यमंत्र्यांचा फोंड्यात अधिकाऱ्यांना इशारा

CM Warns Officials: ‘फोंडा आणि परिसरातील पाण्‍याची समस्‍या आठ दिवसांत साेडवा, अन्‍यथा त्रासात पडाल’’ असा स्‍पष्‍ट इशारा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: ‘‘फोंडा आणि परिसरातील पाण्‍याची समस्‍या आठ दिवसांत साेडवा, अन्‍यथा त्रासात पडाल’’ असा स्‍पष्‍ट इशारा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. फोंड्यात बुधवारी भरलेल्या ‘जनता दरबार’मध्‍ये मुख्‍यमंत्र्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्‍या.

‘‘आम्‍हाला रात्रभर जागून पाणी भरावे लागते. मात्र कमी दाबामुळे हे पाणी सर्वांना पुरत नाही. त्‍यामुळे रात्रभर जागरण होऊनही काहीच उपयोग होत नाही’’ अशी समस्‍या फोंडा परिसरातील लोकांनी मांडल्‍यावर मुख्‍यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना वरील इशारा दिला.

फोंडा शहरासह प्रभूनगर, सपना पार्क, दुर्गाभाट व इतर भागात पाण्याची समस्या तीव्र बनली आहे. पाणी कुठे मुरते? या प्रकाराला जबाबदार कोण? असे प्रश्‍‍न ग्रामस्‍थांनी उपस्‍थित केले.

खराब रस्ते, मलनि:स्सारण सुविधा आणि आरोग्याबाबतच्या समस्या लोकांनी मांडल्या असता संबंधित अधिकाऱ्यांना त्या सोडवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. फोंडा मतदारसंघाबरोबरच इतर मतदारसंघांतील लोकांनीही आपली गाऱ्हाणी मांडली.

फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरात हा जनता दरबार भरला होता. यावेळी राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक विश्वनाथ दळवी, जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस तसेच इतर सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंड्याला सध्या कुणी वालीच उरला नाही. जो तो आपल्या परीने समाजसेवा करतो आहे, पण सरकारी कामांचे काय? असा सवाल फोंडेकर उपस्थित करत आहेत.

गेल्‍या नऊ महिन्‍यांपासून फोंडा मतदारसंघ लोकप्रतिनिधीविना पोरका झाला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडे आम्‍ही आशेने पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी लोकांनी व्‍यक्त केली. मुख्‍यमंत्र्यांनीही त्‍यांना चांगला प्रतिसाद दिला.

‘आयडी’ इस्पितळाचा दर्जा सुधारणार

फोंड्यातील ‘आयडी’ उपजिल्हा इस्पितळातील समस्या दूर करण्यासाठी कार्यवाही सुरू असून लवकरच तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्‍यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यापुढे फोंडा मतदारसंघात आपण सातत्याने भेट देऊन लोकांच्‍या समस्‍या ऐकेन.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT