CM Pramod Sawant With K Rammohan Naidu, Muralidhar Mohol Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: ‘दाबोळी’ सुरू ठेवण्यासाठी केंद्राचे साहाय्य; मुख्यमंत्र्यांनी घेतली हवाई वाहतूकमंत्र्यांची भेट

CM Pramod Sawant: वस्तू व सेवा कर परिषदेच्या रेरा मंत्री समूह गटाच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीत सहभागी झाले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दाबोळी येथील विमानतळ बंद पडू दिला जाणार नाही, या विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिल्ली दौऱ्यादरम्यान केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री के. राममोहन नायडू तसेच राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली.

दाबोळी विमानतळ सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्वतोपरी साहाय्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मिळवले. ‘आयकाव’ या हवाई वाहतूक व्यावसायिकांच्या संघटनेची बैठक १४ सप्टेंबर रोजी गोव्यात घेण्याविषयीही चर्चा झाली.

यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे होते. यावेळी झालेल्या बैठकीत नागरी हवाई वाहतूक सचिव वुम्लून्मंग वुआनाम, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. सुरेश हेही सहभागी झाले होते.

दक्षिण गोव्यातील प्रवाशांसाठी दाबोळी विमानतळ सोयीचा असल्याने तो सुरू राहिला पाहिजे, यावर मुख्यमंत्र्यांनी भऱ दिला. पार्किंग शुल्कात सवलत, इंधन अधिभारातील कपात, नव्या मार्गावर सेवा सुरू केल्यास विमानतळ वापर शुल्कात सूट असे अनेक पर्याय दाबोळी सुरू ठेवण्यासाठी वापरता येऊ शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळ बंद झाल्यास दक्षिण गोव्यातील अर्थव्यवस्थेवर होऊ शकणाऱ्या परिणामांची कारणमीमांसा या बैठकीत केली. खंवटे यांनी पर्यटनवृद्धीसाठी राज्याला दोन्ही विमानतळांची कशी गरज आहे, यावर भर दिला. या बैठकीत दाबोळीवर सध्या असलेल्या प्रवासी सुविधांत वाढ करणे, दाबोळीला इतर ठिकाणांहून येणाऱ्या विमानांची संख्या वाढवणे आणि नव्या ठिकाणांहून दाबोळीला विमानसेवा सुरू करणे आदींबाबत एकमत झाले.

रेरा मंत्री समूहाची पुढील बैठक गोेव्यात

वस्तू व सेवा कर परिषदेच्या रेरा मंत्री समूह गटाच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीत सहभागी झाले. मुख्यमंत्री या गटाचे प्रमुख असून त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बांधकाम क्षेत्रात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करण्यासंदर्भात विविध राज्यांनी अनेक निवेदने दिली आहेत. त्यांनी केलेल्या सूचनांचा महसुलावर कोणता परिणाम होईल, याचा अभ्यास करूनच त्याविषयीच्या शिफारशी परिषदेच्या बैठकीत करण्याचे ठरवण्यात आले आहे. सर्व राज्यांकडून बांधकाम क्षेत्राविषयी ताजी माहिती मागवण्याचेही ठरवले आहे. मंत्रिगटाची पुढील बैठक गोव्यात घेण्याचेही ठरवण्यात आले आहे.

कंपन्यांना देणार सवलत

दाबोळीहून इतर ठिकाणी जाणाऱ्या विमानांची संख्या वाढवणे, विमान कंपन्यांना दाबोळीवरून मोपावर आपले बस्तान हलवण्यास सवलतींच्या रूपाने प्रतिबंध करणे आदी निर्णय या बैठकीत घेतले. विमान कंपन्यांनी मोपावर कार्यालये हलवण्याचा सपाटा लावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT