CM Pramod Sawant  X
गोवा

CM Pramod Sawant: गोव्यात '100 टक्के' विमा संरक्षण देण्याचे लक्ष्य! मुख्यमंत्र्यांनी केले महत्व अधोरेखित

Goa News: आपल्यामागे राहणाऱ्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विमा उतरवला पाहिजे. केंद्र सरकारने बॅंकांच्या माध्यमातून अल्प दरात विमा उतरवण्याची सोय केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

State-wide Campaign Launched to Promote PM Insurance Schemes

पणजी: राज्यातील प्रत्येकाने आपला विमा उतरवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे केले. आपल्यामागे राहणाऱ्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विमा उतरवला पाहिजे. केंद्र सरकारने बॅंकांच्या माध्यमातून अल्प दरात विमा उतरवण्याची सोय केल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेच्या जागरूकता मोहिमेवर दोन वाहने राज्यभरात पाठवण्यात आली आहेत. त्यांना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले. यावेळी नियोजन व सांख्यिकी संचालक विजय सक्सेना उपस्थित होते.

त्यांनी अपघाती मृत्यूच्या विमा संरक्षणाची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले. राज्यात वाहन अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने विमा उतरवला पाहिजे. जानेवारी २०२५ पर्यंत गोव्यात १०० टक्के नागरिकांना विमा संरक्षण देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

SCROLL FOR NEXT