CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Sadanand Shet Tanavade: 'तानावडे यांनी भाजपसाठी झटावे'; खासदार सदानंद शेट यांचा गौरव

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant : सच्चे कार्यकर्ते हीच खरी भाजपची ताकद आहे. पक्षांना नेहमीच तळागाळातल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे काम केले आहे सदानंद शेट तानावडे हे त्याचे उदाहरण आहे.

त्यांनी कार्यकर्ता ते खासदार असा केलेला प्रवास हा आदर्श कार्यकर्त्याची पोचपावती आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

सदानंद शेट तानावडे यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल ताळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आदर्श कार्यकर्ता सोहळ्यात व्यक्त केले. यावेळी कृषिमंत्री रवी नाईक, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई,

सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, माजी मंत्री दामू नाईक यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, तानावडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना घेऊन भाजपसाठी झटावे. कुठलीही गोष्ट सहज साध्य होत नाही. त्यासाठी खूप मोठे योगदान आणि सहिष्णूवृत्ती असणे गरजेचे आहे.

तानावडे यांनी कोणत्याही पदाची व अधिकाराची अपेक्षा न बाळगता प्रामाणिकपणे आपले कार्य सुरू ठेवले. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून ते राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत.

गोव्यातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची आज बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

तानावडे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक अधिकारी नम्रता उलमन यांनी या निवडणुकीचा अहवाल मुख्य निवडणूक आयुक्तांना सोमवारी सादर केला.

त्यानुसार आज निवडणूक आयोगाने तानावडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक अधिकारी उलमन यांनी त्यांच्या खासदार निवडीचे प्रमाणपत्र (फॉर्म २४) प्रदान केला.

त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत , मंत्री, भाजप आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तानावडे यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.

विरोधकांचे आभार

निवडणुकीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विरोधी पक्षांसह सर्वांचे आभार मानले. विरोधकांनी उमेदवार उभा न करता उमेदवार तानावडे यांची निवड बिनविरोध केल्याबद्दल मी विरोधकांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT