साखळी: आज पालक आपल्या मुलांना सरकारी शाळा, हायस्कुलांमध्ये भरती करीत आहेत व त्यांचा निकाल १०० टक्के लागत आहे, ही एक शिक्षणमंत्री या नात्याने अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी न्हावेली-साखळी येथे केले.
न्हावेली-साखळी येथील सरकारी हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागल्याने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा न्हावेलीतील श्री बेताळ देवस्थान सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर वेदांत कंपनीच्या मूल्यवर्धीत उद्योगाचे सीईओ सप्तेश सरदेसाई, डेल्टा कॉर्पोरेशन लि.चे सरव्यवस्थापक ॲड. प्रेमानंद गावस, पंचसदस्य कालिदास गावस, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत गावस, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उत्कर्षा नाईक आदींची उपस्थिती होती.
या गौरव सोहळ्यावेळी दहावीत प्रथम व द्वितीय आलेल्या साईराज गावडे व श्रावणी परवार या दोन्ही विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विचारपूस करून या दोन्ही विद्यार्थ्यांनी जर विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवून ‘एमबीबीएस’मध्ये प्रवेश मिळविल्यास त्यांच्या एमबीबीएस शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण करणार, असे यावेळी जाहीर केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.