Cm Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

IIT Project Goa: 'आयआयटी' कुठे सुरू होणार? CM सावंतांनी टाळले उत्तर; विद्यार्थ्यांना दिला 'नोकरी देणारे व्हा'चा सल्ला

CM PRamod Sawant: ‘आयआयटी’तून शिकून केवळ नोकरी करू नका, तर इतरांना रोजगार देणारे उद्योजक बना, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फोंड्यातील ‘आयआयटी’च्या सहाव्या दीक्षांत समारंभात केले.

Sameer Panditrao

फोंडा: ‘आयआयटी’तून शिकून केवळ नोकरी करू नका, तर इतरांना रोजगार देणारे उद्योजक बना, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. राज्यात लवकरच ‘आयआयटी’ प्रकल्पाचे काम सुरू होणार असून त्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी फोंड्यातील ‘आयआयटी’च्या सहाव्या दीक्षांत समारंभात बोलताना जाहीर केले.

फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरात हा दीक्षांत समारंभ झाला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ‘आयआयटी’ मंडळाचे संचालक आदिल जैनूल तसेच आयआयटी गोवाचे संचालक धीरेंद्र कट्टी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यात ‘आयआयटी’चा प्रकल्प उभारण्यासाठी लवकरच कार्यवाही होणार असून ती आत्यंतिक गरज आहे. उच्च शिक्षणाची संधी सरकारकडून दिली जाते त्याचा होतकरू विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले करीअर घडवावे.

‘आयआयटी’ चा उपयोग हा केवळ स्वतःपुरता न करता राष्ट्र निर्मितीसाठी व्हावा. विकसित भारतासाठी अशा शिक्षणाचा लाभ व्हावा. या दीक्षांत समारंभात १७४ विद्यार्थ्यांना पदव्या देण्यात आल्या. त्यात १४५ पदवी,१५ पीएचडी, १३ एम टेक तर एका पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्याचा समावेश होता.

नियोजित ठिकाण सांगण्यास नकार!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात आयआयटी प्रकल्प सुरू करणार असल्याचे जाहीर केले खरे पण नियोजित जागा कोणती हे सांगण्यास नकार दिला. पत्रकारांनी जागेचा प्रश्न काढला असता सध्या शोध सुरू असून नंतरच जागा कोणती ती जाहीर करू, असे मोघम उत्तर त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

Goa: गोव्याच्या विद्यार्थिनीचा आवाज घुमला राजस्थानात! 'वनिष्ठा'चे युवा संसदेत प्रतिनिधित्व; दहशतवादावर मांडले परखड विचार

Ganesh Idol: स्वतः 'गणेशमूर्ती' तयार करण्याचा आनंद वेगळाच! शिल्पकलेची कार्यशाळा

Goa Assmbly Live: साकवाळचे सचिव ऑरविले व्हॅलेस यांना निलंबित, डीओपीने त्यांच्यावर कारवाई केली नाही

SCROLL FOR NEXT