CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : पैसे उकळणाऱ्यांची गय करणार नाही

मुख्यमंत्री प्रमोद सावंत : तक्रार करा, कारवाई करू

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्य सरकार सर्व व्यवहारात पारदर्शक असून सरकारी पातळीवर कोणत्याही कामांसाठी बेकायदेशीर पैसे आकारले जात नाहीत.

सरकारी नोकरीसाठी, सरकारच्या खात्यात गाडी लावण्यासाठी किंवा इतर कामांसाठी कोणी पैशाची मागणी करत असल्यास सार्वजनिक तक्रार विभागाकडे किंवा सीएमओकडे तक्रार करावी, त्या तक्रारीची योग्य दखल घेऊन कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

नोकरीचे आमिष दाखवून अनेकांकडून पैसे लुटणाऱ्या दोघांना अटक केल्याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी तक्रार करणाऱ्यांचे तसेच योग्य कारवाई करून दोघांना अटक केल्याप्रकरणी पोलिसांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

अशी प्रकरणे जर कुठेही दृष्टीस पडली किंवा निदर्शनास आली, तर थेट तक्रार सादर करावी. या तक्रारींसाठी तक्रार विभागाचे विविध क्रमांक जाहीर केलेले आहेत. त्यावर तक्रारी कराव्यात. अन्यथा सीएमओच्या संकेतस्थळावर तक्रार करावी.

जर अशा तक्रारींची कोणताही सरकारी अधिकारी दखल घेत नसल्यास थेट आपल्याकडे तक्रार करावी, आपण स्वतः लक्ष घालू, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

गैरकृत्ये करणाऱ्यांकडून नाहक बदनामी

सरकारच्या नावाखाली अनेकजण विविध कामांचे आमिष दाखवून गरीब लोकांकडून पैसे उकळतात. हे सरकार पारदर्शी असून लोकांच्या कामांसाठी पैशांची अपेक्षा करत नाही. सरकार लोकांची कामे करण्यासाठी सक्षम असून अशी कृत्ये करणारे सरकारला नाहक बदनाम करतात. त्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT