CM Pramod Sawant in Goa Assembly Session 2023 twitter
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2023 : 10 हजार कोटींच्या कॅसिनो घोटाळ्याची चौकशी करणार : मुख्यमंत्री

यापुढे एकही नवीन कॅसिनो नाही

गोमन्तक डिजिटल टीम

10 thousand crore casino scam : राज्यातील कथित दहा हजार कोटी रुपयांचा कॅसिनो घोटाळा गृह आणि वस्तू सेवा कर (जीएसटी) विभागातर्फे तपासला जाईल. त्याचबरोबर राज्यात यापुढे एकही तरंगता (ऑफशोअर) कॅसिनो येणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हा विषय मांडला होता.

पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मागण्या आणि कपात सूचनांवर उत्तर दिले. सावंत म्हणाले, गोवा निवासाचे दुरुस्तीचे काम झालेले आहे. तीन महिन्यांत ते वापराला सुरू होईल. सदनातील घरकाम करण्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारी इमारती आणि वसाहती दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दिले आहे. परदेश दौरे हे केवळ पर्यटन खात्याकडून होतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि येत्या ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचारी भरती या आयोगामार्फत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाटो येथील बहुमजली प्रशासकीय इमारत बांधण्याचे काम हाती घेतले आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जमीन घोटाळा प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीचा अहवाल थोड्याच दिवसांत येईल.

मुख्यमंत्री म्हणाले ...

  • दक्षता खात्याकडे आलेल्या २७४३ पैकी १९०० तक्रारी मार्गी

  • स्वातंत्र्यसैनिकांच्या ६० मुलांना १५ ऑगस्ट रोजी नियुक्तिपत्रे

  • सर्व बेकायदेशीर कॅसिनो बंद करणार

  • भूखंड घोटाळा तपास अहवाल लवकरच खुला

  • गोव्याचा गुन्हेगारी दर २८ टक्क्यांपेक्षाही कमी

या आयोगावर जो आयुक्त आहे, त्यांच्याकडे स्वतंत्रपणे अधिकार आहेत. ज्यांच्या बदल्या होतात, ती एक प्रक्रिया आहे. स्मृतिस्थळांचे काम हाती घेतले आहे, ते लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, जमीन घोटाळा प्रकरण पुढे आल्याने लोक आता जमीन व्यवहाराच्या कागदपत्रांची तपासणी करून लोक व्यवहार करीत आहेत. सायबर गुन्हे पोलिस स्थानक हे राज्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहेत.

राज्यातील त्या-त्या पोलिस स्थानकांकडून सायबर गुन्हे शाखेकडे तक्रारी हस्तांतरित होतील. त्यामुळे सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार देण्यास कोणालाही यावे लागणार नाही. १६ ट्रॅफिक सेलमध्ये आवश्यक पोलिस दिले जातील. कोलवा आणि कुडचडे येथील सेल बंद करण्याच्या आलेल्या सूचना पाहता ते बंद करण्यास सांगू. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच आम्ही अमलीपदार्थ नष्ट केले जाते.

मानवी तस्करी आणि महिलांविषयी गुन्ह्यांबाबत सावंत म्हणाले, प्रत्येक पोलिस स्थानकात महिला सेल चांगल्या पद्धतीत काम करीत आहे. मानवी तस्करीविषयी कार्यशाळाही पार पडली आहे. पिंक फोर्स व इतर कार्यक्रम गृहखाते करीत असल्याचे ते म्हणाले.

पोलिस खात्यात थोड्या प्रमाणात वाहने कमी आहेत, हे मान्य करीत सावंत म्हणाले, पर्यटक पोलिस युनिट तयार केले जाईल. पोलिस अधीक्षकाच्या नियंत्रणाखाली हे युनिट काम करेल. सर्वत्र पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

पोलिस आणि पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षणासाठी गेलेले आहेत, ते आल्यानंतर असलेली कमतरता भरून निघेल. आयआरबीची भरतीही पूर्ण होईल.

होमगार्डवर बरेच आमदार बोलले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, आपणास होमगार्ड गेली २० - २५ वर्षांपासून काम करीत असल्याची कल्पना आहे. त्यासाठी आम्ही नियमांत बदल केला आहे. दहा वर्षे सेवा केलेल्या, तसेच ५० वर्षांवरील आहेत व शारीरिक चाचणी दिली आहे, त्यांना थेट पोलिस सेवेत घेतले जाणार आहे. त्यामुळे १३० होमगार्डना थेट पोलिस खात्यात सामावून घेतले जाईल आणि अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांना नियुक्तिपत्रे दिली जातील, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

काहीजणांना पाच वर्षांची सेवा मिळणार असली तरी त्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. यापुढे होमगार्ड म्हणून काम करणाऱ्यांना दहा वर्षे सेवा झाली की आपोआप पोलिस सेवेत घेतले जाणार आहे. परंतु त्यासाठी त्यांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झालेली असावी.

गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस वावरत आहेत. अनेक घटना पाहता खपवून घेतल्या जाणार नाहीत. गुन्हे तपासणी टक्केवारी ही ८५ टक्के आहे आणि या वर्षात २८.३ टक्के कमी झाला आहे, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले.

पोलिसांना जेवणाचा भत्ता दिला जाईल. किनारा संरक्षणावर आमचे लक्ष आहे. आम्ही एक बोट घेतली आहे आणि आणखी एक बोट घेणार आहोत. गृहखात्याबरोबर आपली पुढील बैठक होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यातील सर्व बेकायदा कॅसिनो शंभर टक्के बंद करण्यास आपण सांगतो, असे सांगत ते म्हणाले, जे कायदेशीर आहेत तेवढेच ठेवले जातील. जर कोणाच्या लक्षात आले, तर त्यांनी आपल्या लक्षात आणून द्यावेत.

गस्तीसाठी आता इलेक्ट्रॉनिक दुचाक्या घेतल्या जातील. राज्यातील अग्निशमन दलाची केंद्रे अद्ययावत केली जातील. किनारी भागात पोलिस स्थानक निश्चित करून त्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी ठेवली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

अग्निशमन दल हे क्षेत्रीय केंद्र आहे. देशातून अनेक अधिकारी अग्निशमन दलात प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. पणजी, वास्को आणि डिचोलीचे अग्निशमन दलाच्या केंद्राचे काम अपुरे आहे, ते पूर्ण होईल. आपत्ती व्यवस्थापनाबरोबर आयटीद्वारे काम करीत आहोत. १४२ लोकांचे जीवन, ७७४ प्राण्यांचे जीव वाचवले, तर १६९.५३ कोटींची मालमत्ता वाचविली आहे.

काणकोण-धारबांदोडा येथे नवीन अग्निशमन दलाचे केंद्र उभारले जाईल. दलातील कमी असणारी कर्मचारी संख्या भरलेली आहे. गोवा केडरविषयी सावंत म्हणाले, गोवा हे लहान राज्य आहे. तरीसुद्धा आपण गृहमंत्र्यांकडे त्याविषयी विनंती पाठवू.

दक्षता विभागाचे जीपार्डला प्रशिक्षण घेण्यास सूचना केल्या जातील. २०१८ मध्ये राज्य कोकणी चित्रपट महोत्सव झाला होता. कोरोनामुळे दोन वर्षे झाला नाही, आता तो होईल. चित्रपट योजनेची उरलेले रक्कम दिली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: 'सोमवारपर्यंत चौकशी आयोग नेमा अन्यथा...'; कॅश फॉर जॉब प्रकरणी पाटकरांचा सावंत सरकारला अल्टिमेटम

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या ७८ वेबसाईट्स ब्लॉक; गोवा पोलिसांचा दणका, दोघांना अटक

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Politics: मांद्रेतील जनतेच्या मनात कोण? मायकल लोबोंमुळे हवा तापली; अरोलकरांनी दिलं चॅलेंज

Goa Crime: धारदार शस्त्राने वडिलांचा जीव घेणारा प्रमोद 'मानसिक रुग्ण'; बहिणीचा पोलिसांसमोर खुलासा

SCROLL FOR NEXT