Goa News |Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करणार -मुख्यमंत्री प्रमोद सावंत

येत्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी शिबिर योजना राबविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोवा सरकारद्वारे अंधत्व रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविले जात आहेत. सर्वांसाठी दृष्टी (व्हिजन फॉर ऑल) योजने अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून आरोग्य खाते आणि इतर संघटनांच्या माध्यमातून अनेक शिबिरे राबविली जातात.

जेणेकरून आम्ही अनेकांच्या डोळ्यात दृष्टी आणि मुखावर हास्य फुलवू शकलो. आम्ही येत्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी शिबिर योजना राबविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

ते दिवाडी येथील हॉटेलमध्ये आयोजित इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया आणि केरेटोरफ्रॅक्टिव्ह सर्जनच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

व्यासपीठावर आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, ललित वर्मा, अमरिष डरक, राजेश सिन्हा, नर्मता शर्मा, अरूण कुलकर्णी, अरूण अरचिरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सांवत म्हणाले, भारताला अंधत्वातून मुक्त करणे गरजेचे असून त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे आहे. डॉ. ललित वर्मा म्हणाले, अनेक परिषदांमध्ये, परिसंवादांमध्ये केवळ वक्ते विचार मांडतात व श्रोते ते ऐकतात. मात्र या परिसंवादांमध्ये संवाद साधला जातो.

डॉक्टरी पेशा रुग्णकेंद्रित हवा

डॉक्टरीपेशा हा रूग्णकेंद्रित हवा. डॉक्टरांनी तपासणीसाठी लागणाऱ्या विविध उपकरणांवर खर्च करणे आवश्‍यक आहे. मी आज देखील रूग्णांना कशा पद्धतीने चांगली सेवा देता येईल याचा विचार करतो. अनेक रुग्ण ग्रामीण भागातून येतात.

मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी शिबिराची वाट पाहतात, याचाही विचार होणे गरजेचे आहे, असे मत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले.

ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख बी. डी. वायगेकर, अंबेजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन भास्कर खैरे यांचा त्यांच्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. अतुल कडाणे, डॉ. शिरीष थोरात, डॉ. अरूण अचित्रे, डॉ. नितेश पांडे, अशोक कुमार यांचा यावेळी त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral video: चालत्या कारच्या छतावर चढले अन्… तरुणांचा धोकादायक स्टंट व्हायरल; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

BCCI Election: बीबीसीआयच्या निवडणुकीत गोवा क्रिकेट असोसिएशनचा मतदार असणार का? शनिवारी होणार निर्णय

गोव्यात असणाऱ्या परराज्यांतील कंपन्यांनी येथेच मुलाखती घेऊन स्थानिकांना रोजगारास प्राधान्य द्यावे; CM सावंतांचे यार्वीच निर्देश

Goa Rain: गोव्यात पावसाची दमदार वापसी! विजांचा कडकडाट, पुढील तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

England T20 World Record: अशक्य ते शक्य! इंग्रजांनी टी-20 मध्ये केल्या 300 धावा; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वविक्रमाची नोंद, पाहा Highlights

SCROLL FOR NEXT