Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Corona: कोरोनायोद्धांना 3 वर्षानंतरही पगारवाढीचे पैसे नाही; मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन विरले हवेत

20 टक्के पगारवाढीचे दिले होते आश्वासन

Akshay Nirmale

Goa Corona: कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्या महारोगराईच्या पहिल्या दोन लाटांमध्ये आघाडीवर राहून महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या कोरोना योद्धांचे कौतूक खूप झाले. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 20 टक्के पगारवाढीचे आश्वासनही दिले होते. तथापि, ही वाढ कोविडयोद्ध्यांना अद्यापही मिळालेली नाही.

मुख्यमंत्री सावंत यांनी 2020 मध्ये कोरोना साथीच्या सुरूवातीस ही घोषणा केली होती. त्या काळात ऐन कोरोना महारोगराईत आघाडीवर राहून हे योद्धे काम करत होते. त्यांना नायक म्हणूनही गौरवले जात होते. तेव्हा मुख्यमंत्री सावंत यांनी 20 टक्के वाढीचे आश्वासन दिले होते तसेच विमा संरक्षणाचीही घोषणा केली होती.

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) गोवा या डॉक्टरांच्या संघटनेने, गुरुवारी अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तेव्हा या आश्वासनाची आठवण मुख्यमंत्र्यांना करून देण्यात आली. 20 टक्के पगारवाढ नेमकी कुणाला, याबाबत संदिग्धतेमुळे हा प्रस्ताव लांबणीवर पडला होता.

याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला जीएमसी आणि आरोग्य सेवा संचलनालयाकडून अशा दोन स्वतंत्र फाईल्स सादर करायच्या होत्या. पण अशा फाईल्स सादर केल्या गेल्या नाहीत, असे समजते. तथापि, आता कोरोनायोद्धा म्हणून काम केलेल्या डॉक्टरांनाही या पगारवाढीचा अपेक्षा राहिलेली नाही. परंतु कनिष्ठ डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना काहीतरी द्यायला हवे, असे मानणारा एक वर्ग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT