Konkani language Goa Dainik Gomantak
गोवा

"कोकणीसाठी जे 50 वर्षांत झालं नाही ते केलंय, शंका असेल तर समोर या" मुख्यमंत्र्यांचं ओपन चॅलेंज; Watch Video

CM Pramod Sawant on Konkani: कोकणी भाषेसाठी आपले सरकार आणि आपण कायम कार्यरत असून, येणाऱ्या काळातही त्यासाठी प्रयत्न करत राहण्याचे आश्वासन दिले

Akshata Chhatre

डिचोली: शणै गोंयबाब यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त डिचोली येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोकणीप्रेमींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणी भाषेसाठी आपले सरकार आणि आपण कायम कार्यरत असून, येणाऱ्या काळातही त्यासाठी प्रयत्न करत राहण्याचे आश्वासन दिले.

'कोकणी भाषा गोव्यात सुरक्षित, उगाच वाद नको!'

गोव्यात कोकणी भाषा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विनाकारण भाषेचा वाद निर्माण करणारी काही मंडळी असली तरी, गोव्यात कोणीही कोकणी भाषेला कमी लेखू शकत नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. गोव्यातील तरुणांनी अधिकाधिक कोकणी साहित्य वाचावे आणि कोकणी भाषेत लेखन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारने अनेक उपक्रम राबवले आहेत, ज्यात कोकणी अकादमीसाठी उत्तम जागा उपलब्ध करणे आणि कोकणी भाषेसाठी वाचनालय उभारणीचा समावेश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गेल्या ५० वर्षांतील प्रयत्न आणि मुख्यमंत्र्यांचे आव्हान

गेल्या ५० वर्षांत गोवा राज्यात कोकणी भाषेसाठी जे प्रयत्न झाले नाहीत, ते सर्व डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने केले आहेत, असा दावा त्यांनी केला. "जर कुणाला यावर प्रश्न असतील, तर त्यांनी बिनधास्त येऊन विचारावे, मी नक्की उत्तर देईन, हे माझे आवाहन आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.

नवीन शिक्षण धोरणात स्थानिक भाषेला प्राधान्य

विकसित भारताचे स्वप्न पाहताना स्थानिक भाषांना प्राधान्य दिले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. नवीन शिक्षण धोरणात स्थानिक भाषा शिकवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मुलांनी नवीन भाषा नक्कीच शिकाव्यात, पण त्यांना स्थानिक भाषेचे ज्ञान असलेच पाहिजे.

पालकांनी मुलांना अभिमानाने कोकणी भाषा शिकवावी, कारण नव्या पिढीला या भाषेचे महत्त्व समजणे आवश्यक आहे आणि म्हणूनच सरकार यासाठी कायम कार्यरत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. येणाऱ्या काळात कोकणी अनुवादकांची गरज भासणार असून, तरुणांना नोकरीच्या संधीही मिळतील, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT