CM Pramod Sawant: चार राज्यांच्या निवडणूक निकालांमधून सनातन धर्माविरोधात भूमिका घेणाऱ्या इंडिया आघाडीला लोकांनीच त्यांची जागा दाखवून दिली आहे. तीन राज्यांमध्ये भाजप सत्तेत येत आहे.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रादेखील अपयशी ठरल्याचे यातून दिसून येत आहे, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर केली.
चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर भाजपने तीन राज्यांमध्ये विजयाच्या दिशेने आघाडी घेतली आहे. त्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा मोदींचा विचार सर्वांनी स्विकारला आहे. आणि मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे बहुमताचे भाजपचे सरकार आले आहे. तेलंगणातील जनतेनेही गतवेळीपेक्षा जास्त मते भाजपला दिली आहेत.
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या अंत्योदय तत्वासाठी भाजप सरकारसह अगदी पन्ना प्रमुखांपासून ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी प्रयत्न केले. विशेषतः मध्यप्रदेशात मोठा जनादेश भाजपला मिळाला आहे.
मी मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलगंणा आणि राजस्थान या चारही राज्यात भाजपसाठी प्रचार केला होता. मध्य प्रदेशात भाजपच्या खासदारांचे रिपोर्ट कार्ड मी वितरीत केले होते.
तर राजस्थानातील काँग्रेस सरकारविरोधाती वाढत्या गुन्हेगारीबाबतची आणि घोटाळ्यांची, भ्रष्टाचाराची रेड डायरीदेखील मीच तिथे जाऊन वितरीत केली होती.
छत्तीसगडमधील प्रचार मोहिमेवेळी आम्ही तेथील काँग्रेस सरकारच्या घोटाळ्यांची माहिती जनतेला दिली. याशिवाय तेलंगणातील मुख्यमंत्री केसीआर यांनाही भाजपनेच पराभूत केले आहे. आणि आगामी काळात जो कोणी मुख्यमंत्री होईल, त्यालाही भाजप पराभूत करेल.
या विजयातून केवळ मोदींची गॅरंटी आहे, बाकी कुणाचीही गॅरंटी देता येता नाही, हेही सिद्ध झाले आहे.
सनातन धर्माविरोधात भूमिका घेणाऱ्या इंडिया आघाडीला लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. केवळ इंडिया आघाडीच नव्हे तर राहुल गांधींची भारत जोडो यात्राही अपयशी ठरली आहे, हेच लोकांनी यातून दाखवून दिले आहे.
आगामी काळात लोकसभा निडवणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकेल. लोकसभा निवडणुकीत भाजप 400 हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्रीपाद नाईक म्हणाले, विरोधकांनी खूप अफवा पसरवल्या. राजकारण केले. पण तरीही भाजपला हे यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हे यश मिळवले. आजचा दिवस विजयाचा दिवस आहे.
भाजपच्या विकासाचे हे यश आहे. त्या त्या राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार. कारण त्यांच्यामुळे हा विजयी दिवस दिसला आहे. जगभरात भारताचे नाव मोदींमुळे होत आहे. भारताला मानसन्मान मिळत आहे.
2047 मध्ये जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.