CM Pramod Sawant offer tributes to Savarkar CM Twitter Handle
गोवा

CM Pramod Sawant: सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्याच जेलला भेट देत गोव्याच्या सीएमनी अर्पण केली श्रद्धांजली

सेल्युलर जेलमध्ये 101 दिवे प्रज्वलित करण्यात आल्याचे सावंत यांनी ट्विट केले आहे.

Pramod Yadav

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या 57 व्या पुण्यतिथीनिमित्त अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेलमध्ये श्रद्धांजली वाहिली. यानिमित्ताने रविवारी सेल्युलर जेलमध्ये 101 दिवे प्रज्वलित करण्यात आल्याचे सावंत यांनी ट्विट केले आहे. (Goa Chief Minister Pramod Sawant)

यावेळी सावंत यांनी शब्दामृत संस्थेने आयोजित केलेल्या मेळाव्याला संबोधित केले, ज्यात संस्थेचे प्रमुख पार्थ बावस्कर, सावरकरांचे नातू रणजित सावरकर आणि महाराष्ट्र आणि गोव्यातील सावरकर 'भक्त' उपस्थित होते.

“स्वातंत्र्यवीर सावरकरांना सेल्युलर जेल अंदमान येथे त्यांच्या 57 व्या ‘समर्पण’ दिनानिमित्त आदरांजली वाहिली. ज्या कोठडीत सावरकरांना ठेवण्यात आले होते आणि त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती त्या कोठडीत जाऊन प्रार्थना करण्यात मला सन्मान वाटतो." असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

यावेळी आयोजित कार्यक्रमात सावरकरांनी लिहलेले गीत सादर करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या पवित्र स्थळांना भेट देता आणि वातावरण अनुभवता आले याचा मला अभिमान आहे. असे सावंत यांनी म्हटले आहे.

विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी भागलपूरच्या नाशिक जिल्ह्यातील एका सामान्य हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. सावरकरांनी क्रांतिकारी कार्यात भाग घेण्यासाठी स्वतःची संघटना स्थापन केली.

कायदेशीर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते इंग्लंडमध्ये होते. इंग्लंडमधून भारतात परतताच, सावरकर आणि त्यांचे भाऊ गणेश यांनी 'भारतीय परिषद कायदा 1909' विरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली.

1910 मध्ये सावरकरांना ब्रिटीश पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. 4 जुलै 1911 मध्ये त्यांना अंदमान आणि निकोबार बेटांमधील सेल्युलर जेलमध्ये टाकण्यात आलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT