CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Sawant यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट; केली 'या' मुद्यांवर चर्चा

गोव्यातील ई-मोबिलिटी अन् हरित ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकार सकारात्मक

दैनिक गोमन्तक

गेले काही दिवस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गोव्याच्या खाजगी दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद यांनी आज त्यांची पणजी येथे भेट घेतली असून यावेळी राज्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा झाली आहे. अशी माहिती सावंत यांनी दिली.

(CM Pramod Sawant Met Union Minister for Road Transport and Highways Shri Nitin Gadkari at Panaji)

याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, नितीन गडकरी हे नेहमीच सकारात्मक आणि गोव्याला आवश्यक असलेली केंद्राची मदत देण्यास उत्सुक असतात याच प्रमाणे आज त्यांच्याशी चर्चा झाली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोवा राज्यातील रस्ते, महामार्ग, पायाभूत सुविधा याच्याशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा झाली. तसेच राज्यातील ई-मोबिलिटीवर चर्चा करताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करत दळणवळण आणि रस्ते वाहतूकीसाठीच्या पायाभूत सुविधांवर चर्चा करण्यात आल्याचं ते म्हणाले.

या चर्चेवेळी गोवा राज्यातील प्रस्तावित हरित ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांना राज्यात कोणत्या प्रकारे चालना देता येईल यावर ही चर्चा झाली असून यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे आश्वासन ही यावेळी देण्यात आल्याचं ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT