Goa CM Dr Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Assemby: सिकेरी, खोर्जुवे पदपुलाची जमीन मिळाल्‍यास पुनर्बांधणी

Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर दिले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मये मतदारसंघातील सिकेरी व हळदोणे मतदारसंघातील खोर्जुवे या दोन्ही गावांमध्ये असलेल्या खाडीवरील पदपुलाचे पुनर्बांधकाम जागा उपलब्ध केल्यास केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

या नाल्यावरील पदपूल जुना असून तो मोडकळीस आलेला आहे. हा पदपूल केव्हाही कोसळू शकतो, त्यामुळे तो धोकादायक बनला आहे. या पुलावरून खोर्जुवे येथील काही विद्यार्थी मये येथील शाळांमध्ये शिकण्यासाठी जातात. त्यामुळे हा पदपूल खूपच महत्वाचा आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने त्‍याची पाहणी करून पुलाचे बांधकाम करणे शक्य असल्याचा अहवाल दिला आहे. या पुलामुळे खोर्जुवे तसेच सिकेरी येथील रहिवाशांची अनेक वर्षांपासूनची समस्या सुटणार आहे, असे आमदार शेट म्हणाले.

सदर पदपूल लोखंडाचा वापर करून तेथील स्थानिक लोकप्रतिनिधीने खाण कंपन्यांच्या मदतीने बांधला होता. दरदिवशी सुमारे १०० दुचाकीचालक या पदपुलाचा वापर करतात. नाल्यातील खाऱ्या पाण्यामुळे पदपुलाचे लोखंड गंजून खराब झाले आहे.

त्यामुळे हा पदपूल पादचारी व दुचाकीस्वारांसाठी धोकादायक बनला होता. पैरा-खोर्जुवे येथे जीएसआयडीने तेथून १.४० किलोमीटर अंतराचा नवा पूल बांधला आहे. त्याचा वापर न करता लोक या धोकादायक पुलाचाच वापर करतात. आमदार शेट यांनी केलेल्या मागणीची दखल घेत त्याचे पुनर्बांधकाम केले जाईल असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT