CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Cutbona Jetty: सरकारी मालमत्तेचा गैरवापर केल्यास आता 'कठोर कारवाई' ! कुटबण जेटी उद्घाटनावेळी मुख्‍यमंत्र्यांचा इशारा

CM Pramod Sawant: मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या हस्‍ते रविवारी कुटबण येथे बांधलेल्‍या नवीन मच्‍छीमारी जेटीचे उद्‍घाटन करण्‍यात आले. बोटीवर काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची काळजी बोटमालकांनी घ्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant About Government Property Encroachment

मडगाव: मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या हस्‍ते कुटबण येथे बांधलेल्‍या नवीन मच्‍छीमारी जेटीचे उद्‍घाटन करण्‍यात आले. यावेळी गोव्‍यात सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण करून त्‍या मालमत्तेचा गैरवापर करण्‍याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारांवर अंकुश आणण्‍यासाठी गैरवापर करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्‍यांनी दिला.

कुटबण येथील ही नवीन जेटी अडीच वर्षांपूर्वी बांधली होती. मात्र, काही कारणास्‍तव उद्‍घाटन न झाल्‍याने ती विनावापर पडून होती. काल मुख्‍यमंत्र्यांनी या जेटीचे उद्‍घाटन करून ती मच्‍छीमारांसाठी खुली केली.

यावेळी मच्‍छीमार खात्‍याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, वेळ्‍ळीचे आमदार क्रुझ सिल्वा, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस, मच्छीमार खात्याच्या संचालिका आश्विनी बी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवाळे, उदय प्रभुदेसाई, मामलेदार प्रताप नाईक गावकर तसेच कुटबण बोटमालक संघटनेचे अध्यक्ष पेट्रीक डिसोझा उपस्‍थित होते.

‘बोटमालकांनी कामगारांची काळजी घ्यावी’

मच्छीमार बोटीवर काम करण्यासाठी येणाऱ्या कामगारांचे अगोदर आरोग्य कार्ड करावे तसेच त्यांची वैयक्तिक संपूर्ण माहिती पोलिसांना द्यावी. ज्‍या बोटी चार-पाच दिवस खोल समुद्रात राहतात त्यांनी सक्तीने बोटीवर शौचालयाची व्यवस्था करावी तसेच बोटीवर काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची काळजी बोटमालकांनी घ्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘काँग्रेसचे मच्छीमारांकडे दुर्लक्षच’

कुटबण जेटीची काही कामे अद्याप शिल्लक आहेत. उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने ती पूर्ण करता येत नाहीत. ज्या व्यक्तीने याचिका दाखल केली आहे, त्याला बोटमालकांनी जाब विचारला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. वेळ्‍ळी मतदारसंघाचा माजी आमदार हा मंत्री होता. मात्र, त्याने कधीच कुटबण जेटीला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या नाही. त्यानंतर आमदार झालेल्या व्यक्तीच्या मच्छीमार बोटी होत्या, त्यानेही कुटबण जेटीवरील समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले नाही. काँग्रेस पक्षाने कधीच मच्छीमारांच्या कामाकडे गांभीर्याने पाहिले नाही, असाही आरोप मुख्‍यमंत्र्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT