CM Pramod Sawant on Shripad Naik  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून भाजपकडून श्रीपादभाऊच..! मुख्यमंत्र्यांनीच दिले संकेत

वाढदिनाच्या कार्यक्रमात सूतोवाच; विविध उपक्रम

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: लोकसभा निवडणुकीचे रणांगण जवळ आले आहे. त्या पार्श्वभुमीवर उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनाच उमेदवारी मिळेल, असे संकेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

बुधवारी श्रीपाद नाईक यांच्या वाढदिनानिमित्त सापेंद्र येथे नाईक यांच्या निवासस्थानी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, श्रीपाद ‘भाऊ’ नाईक यांनी गेल्या 25 वर्षापासून खासदार म्हणून गोवा आणि देशाची सेवा केली. आज वाढदिनानिमित्त त्यांच्या कामाविषयी माहिती देणारी पुस्तिका प्रसिद्ध केली आहे.

परंतू त्यांच्या सर्व कामांबद्दल सविस्तर सांगायला गेले तर मोठा ग्रंथ लिहावा लागेल. भाऊ हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. त्यांना पुन्हा एकदा संधी द्या.

केक कापून भाऊंचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी, राज्य मंत्रीमंडळातील मंत्री, आमदार उपस्थित होते. सर्वांचे स्वागत श्रीपाद नाईक यांचे पुत्र तथा उत्तर गोवा जिल्हापंचायतीचे अध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी केले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, 1999 पासून ते आतापर्यंत गोव्यात झालेल्या बदलात भाऊंचा सिंहाचा वाटा आहे. धारगळ येथे आयुष रूग्णालय उघडले. लवकरच जलक्रीडा संस्थेचे उद्घाटन होईल. आयुष डॉक्टर आणि वेलनेस क्लिनिक भाऊंनी सुरुवात केली. मोफत आरोग्य चिकित्सा देण्याचे काम केले. ते पक्ष बघून काम करत नाहीत.

श्रीपाद नाईक म्हणाले की, सर्वांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही उभे आहोत. एकटा माणूस काही करू शकत नाही, त्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता असते. तुम्ही जबाबदारी पेलण्याची ताकद दिली. माणसाचा आतून विकास होतो तेव्हाच तो समाजासाठी काही करू शकतो.

दामू नाईक म्हणाले, गोव्यात भाजपची टिंगल उडवली जात होती त्या काळापासून श्रीपाद नाईक पक्षासोबत आहेत. त्यांच्या पत्नी विजयाताई यांनी देखील योगदान दिले. जे कोणीही गोव्यात दिल्लीला जायचे ते त्यांच्या घरी जाऊन थांबायचे.

दरम्यान, श्रीपाद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर झाले. यावेळी मोफत औषधे देण्यात आली. तसेच विविध शाळांना एलसीडी प्रोजेक्टर आणि इतर उपकरणे देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी! स्टार खेळाडूनं निवृत्ती मागे घेतली, T-20 आणि कसोटीतही खेळणार

'या दुःखद घटनेने मन हेलावले', हडफडे नाईटक्लब प्रकरणानंतर मालकाची पहिली प्रतिक्रिया; कोण आहे हा सौरभ लुथरा?

Goa Bus Stand: गुड न्यूज! गोव्यातील 'ही' बसस्थानके होणार चकाचक; जवळपास 400 कोटी खर्चून मिळणार अद्ययावत सुविधा

Serendipity Festival 2025: सेरेंडिपीटीत अवतरणार महाकाय नरकासुर! 5 वेगवेगळ्या ठिकाणी मिळणार पाहायला; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

एकाच घरातील तिघी बहिणी, भाऊ आणि बॅचलर पार्टीसाठी आलेला 'इशाक'; हडफडे क्लब आगीमुळे एका क्षणात अनेक कुटुंबांवर शोककळा

SCROLL FOR NEXT