Goa CM Pramod Sawant And Sushant Singh Rajput Dainik Gomantak
गोवा

Goa CM:...अन्यथा सुशांतसिंह राजपूतसारखी वेळ येईल; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी युवकांना समजावले आरोग्याचे महत्व

Goa CM Pramod Sawant On Sushant Singh Rajput: शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दिवसातून किमान पाचतरी सूर्यनमस्कार घालावे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Pramod Yadav

पणजी: शरीरासोबत मनाचे आरोग्य देखील महत्वाचे आहे. मानसिक आरोग्य उत्तम नसल्यास काही जणांवर सुशांतसिंह राजपूतसारखी वेळ येऊ शकते. त्यामुळे शारीरिक व मानसिक सदृढतेसाठी रोज अर्धा तास वेळ काढा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. दरबार हॉल, राजभवन येथे आयोजित युवा नेता परिषदेत मुख्यमंत्री युवा प्रतिनिधींना संबोधित करत होते.

पंकज सायनेकर या विद्यार्थ्यांने राज्यात योगा सुरु करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. सायनेकर सलग २४ तास सूर्यनमस्कार घातल्याचा विक्रम केला असून, याची लिम्क बुक ऑफ रेकॉर्ड्मध्ये नोंद झाल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली.

'शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दिवसातून किमान पाचतरी सूर्यनमस्कार घालावे. आपले आरोग्य सर्वात महत्वाचे आहे, पण याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि कपडे व वस्तूंवर खर्च करतो', असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

'आपण काय खातो आणि आरोग्याची काळजी कशी घेतो हे महत्वाचे आहे. लीडर होण्यासाठी फीट होणे देखील तितकेच महत्वाचे आहे. दिवसातून किमान अर्धा तास तरी स्वत:च्या आरोग्यासाठी द्या. तन आणि मन दोघांची काळजी घ्या. शरिराबरोबर मन देखील तितकेच फिट ठेवणे महत्वाचे आहे.'

'मनाने भक्कम नसल्यास बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने जशी आत्महत्या करण्याची वेळ अनेकांवर येते. त्यामुळे मनाचा व्यायमही महत्वाचा आहे. शारीरिक व मानसिक सदृढतेसाठी रोज अर्धा तास वेळ काढा', असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

युवकांनी स्वतःला घडविण्यासाठी वेळ द्यावा. ज्यावेळी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्याल त्यावेळीच देशाचा विकास होईल. आयुष्यात जर सर्वाधिक किंमतीचे काही असेल तर आपले आरोग्य. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी दिवसातील किमान अर्धा तास स्वतःसाठी देणे, व्यायाम करणे गरेजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT