Traditional Salt Industry Goa: गोव्याच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या पारंपरिक मिठागर उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
नुकत्याच झालेल्या सांतआंद्रे मतदारसंघातील मिठागर भेटीदरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी स्थानिक मिठागर कामगारांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि या क्षेत्राला भक्कम शासकीय मदतीचे आश्वासन दिले. दरम्यान मिठागरांच्या पुनरुज्जीवनाची हमी देत मिठागरातील मीठ सरकार विकत घेणार असल्याचे देखील त्यांनी स्थानिकांना सांगितले.
यावेळी सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर हे देखील स्थानिक मिठागर कामगारांसोबत उपस्थित होते. त्यांनीही मिठागरांच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने अधिक सक्रिय भूमिका बजावावी, अशी मागणी केली. या उपक्रमाचा भाग म्हणून गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय मिठागर पुनरुज्जीवन मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ही मोहीम सेंट्रल सॉल्ट अॅण्ड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट, भावनगर व स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्याने राबविली जात आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मिठागरांच्या जीर्ण अवस्थेतील पायाभूत सुविधा, घटलेले उत्पादन आणि रोजगारावर आलेले संकट या बाबी स्थानिक मिठागर कामगारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. यावर उत्तर देताना, मुख्यमंत्री सावंत यांनी ऑक्टोबरपासून जलस्त्रोत खात्याद्वारे नवीन पाटबंधारे बांधण्याचे जाहीर केले. पाण्याचे योग्य नियमन करून मिठागरांची नैसर्गिक स्थिती सुधारण्याचा हा मुख्य उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.