Goa-Mumbai Vande Bharat Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : ...तर मुंबई अवघ्या पाच तासांवर ; मडगावात ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा थाटात शुभारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

‘वंदे भारत’ ही सध्या केवळ सेमी एक्सप्रेस ट्रेन आहे. मडगाव-मुंबई या मार्गाचे डबल ट्रॅकिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर ‘वंदे भारत’ एक्सप्रेसची संख्या वाढविण्यात येईल. त्यामुळे मुंबई ते गोवा हे अंतर अवघ्या पाच तासांत पूर्ण करणे शक्य होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव येथे दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, मंगळवारी दुपारी मडगाव- मुंबईसह अन्य चार मार्गांवरील एक्सप्रेस ट्रेनचा शुभारंभ भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून व्हर्चुअल पद्धतीने केला. यावेळी मडगाव येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर.

मडगावचे आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल, डीजीपी जसपाल सिंग, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी संचालक संजय गुप्ता, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आणि नगरसेवक उपस्थित होते. वंदे भारत एक्सप्रेसमुळे गोव्याच्या पर्यटनास चालना मिळेल. गोवा जागतिक पर्यटन नकाशावर आहे. आता या ट्रेनमुळे पर्यटकांना आरामदायी प्रवासाची संधी मिळेल, असे पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले.

मुंबई-गोवा रेल्वेमार्गाचे लवकरच दुपदरीकरण

फाईव्ह स्टार स्थानक

मडगाव हे गोव्याचे गेटवे रेल्वे स्टेशन आहे. मडगावात दक्षिण भारतातील राज्यांसह, कोकण, महाराष्ट्र येथून येणाऱ्या सर्व गाड्या थांबतात. त्यामुळे मडगाव हे पंचतारांकित रेल्वे स्टेशन सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. यासंदर्भात आम्ही केंद्रीय रेल्वेमंत्री आश्र्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली आहे. सध्या मडगाव रेल्वे स्थानक परिसराच्या नूतनीकरणाचे काम जीआयडीसीमार्फत सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘मोपा’मुळे २० राज्यांशी ‘कनेक्शन’

मोपा विमानतळ सुरू झाला असला, तरी दाबोळीही सुरूच राहील. मोपा विमानतळ सुरू झाल्यावर दाबोळी बंद होईल, अशी जी आवई उठविली होती, ती धादांत खोटी आहे. मोपा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय देशांतील प्रमुख शहरांना गोव्याला थेट जोडण्यात येईल. सध्या गोवा देशातील २० राज्यांना जोडला गेला आहे. भविष्यात गोवा सर्व राज्यांशी जोडला जाईल, असा विश्र्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

तीन वर्षांत ४०० वंदे भारत

वंदे भारत ही पूूर्णत: भारतीय बनावटीची एक्सप्रेस ट्रेन आहे. सध्या एकूण 23 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. पुढील तीन वर्षांत देशात 400 नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहेत, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाची आश्र्वासने दिली होती. त्यांची पूर्तता होताना दिसत आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT