CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Tiatr Art: 'तियात्र'ला युनेस्कोचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, आगामी अधिवेशनात मांडणार ठराव; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Tiatr UNESCO Status: तियात्र कला प्रकाराला युनेस्कोचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार असून आगामी अधिवेशनात या बाबतचा ठराव संमत करण्यात येणार आहे.

Manish Jadhav

मडगाव: तियात्र कला प्रकाराला युनेस्कोचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार असून आगामी अधिवेशनात या बाबतचा ठराव संमत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आश्वासन तियात्र अकादमीच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

तियात्र अकादमीचे अध्यक्ष अॅन्थनी बार्बोझा यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी गोव्‍यातील तियात्राच्‍या विकासाला गती मिळण्‍यासाठी सरकारने फंड वाढवून द्यावा, अशीही मागणी करण्‍यात आली. मागण्यांचा विचार करून त्या सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याची माहिती अध्यक्ष अॅन्थनी बार्बोझा यांनी दिली. तियात्र कला हे गोव्याचे वैशिष्ट्य आहे. ही कला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवण्याचे प्रयत्न सरकार करणार आहे.

अर्थसंकल्पात तियात्र अकादमीसाठी अधिक निधीची तरतूद केली जाईल. तियात्र कलाकारांना पद्मश्री पुरस्कारासह इतर राष्ट्रीय सन्मान मिळावेत, यासाठीही सरकारद्वारे प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात उपाध्‍यक्ष मार्कुस गोन्‍साल्‍वीस, फादर डॉएल डायस, अवितो पिरिस दी मिनेझिस, प्रदीप नाईक, जिजस आंताव, विल्यम फर्नांडिस, आपोलिना रिबेलो, आंतोनेत डिसोझा, पेद्रू वाझ, सायमन रिबेलो, सदस्य सचिव सुरेश दिवकर, विन्सी क्‍वॉद्रूश यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT