CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

खुल्या बाजारातून वीज खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता प्रस्ताव

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात सध्या वीजेच्या टंचाईमुळे लोड शेडिंगचं संकट गडद होऊ लागलं आहे. सातत्याने होणाऱ्या लोड शेडिंगमुळे गोव्यातील उद्योगधंद्यांचं कामही प्रभावित होऊ लागलं आहे. अखेर उद्योग संघटनांच्या मागणीनुसार खुल्या बाजारातून दररोज 120 मेगावॅट वीज खरेदी करण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंजुरी दिली आहे. (CM Pramod Sawant gives nod to purchase 120mw from open market)

वीजटंचाईमुळे गोव्यात सध्या भारनियमनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं असतानाच अनेक ठिकाणी विजेचा लपंडावही सुरु आहे. गोमंतकीय जनतेची भारनियमनापासून सुटका करण्यासाठी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी खुल्या बाजारातून वीज खरेदीसाठी सरकार तयार असल्याचा प्रस्ताव दिल्याचं स्पष्ट केलं होतं. हा प्रस्ताव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. आज मुख्यमंत्र्यांनी 120 मेगावॅट वीज खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

सद्यस्थितीत गोवा राज्याला अतिरिक्त 100 मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. ही वीज सामान्य दरापेक्षा जास्त दराने खरेदी करावी लागणार आहे. या अतिरिक्त दराच्या विजेसाठी उद्योजकांनी परवानगी दिली असून खुल्या बाजारातून वीज खरेदी केलेल्या ट्रेड पावरचा अतिरिक्त खर्च सहन करण्याची संमती उद्योजकांनी दर्शवली आहे. भारनियमनामुळे राज्यातील उद्योग संकटात सापडले आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी खुल्या बाजारातून वीज खरेदीसाठी मंजुरी दिल्यामुळे गोव्यातील उद्योगांना तुर्तास दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT