भारनियमन टाळण्यासाठी गोवा खुल्या बाजारातून वीज खरेदी करणार : वीजमंत्री

वीज खरेदीचा प्रस्ताव आर्थिक मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती
Goa Electricity
Goa ElectricityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : वीजटंचाईमुळे गोव्यात सध्या भारनियमनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. अनेक ठिकाणी विजेचा लपंडावही सुरु असल्याचं चित्र आहे. मात्र आता गोमंतकीय जनतेची भारनियमनापासून सुटका करण्यासाठी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. खुल्या बाजारातून वीज खरेदीसाठी सरकार तयार असल्याचा प्रस्ताव दिल्याचं ढवळीकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Goa Electricity
वाढत्या उष्णतेमुळे गोव्यातील धरणातील पाणीपातळी 60 टक्क्यांवर

देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे सध्या वीजेचं संकट आणखीच दाट होत चाललं आहे. अनेक राज्यांमध्ये भारनियमनही (Load Shedding) सुरु करण्यात आलं आहे. कोळशाच्या खरेदीसाठी वीज महामंडळानी तयारी सुरु केली असली तरीही अद्याप मागणीच्या तुलनेत पुरवठ्याचं गणित अनेक राज्यांना सोडवता आलेलं नाही. गोव्यातही वीजेच्या टंचाईमुळे सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. खुल्या बाजारातून दररोज 125 ते 150 मेगावॅट वीज खरेदी करण्यास सरकार तयार असल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी दिली आहे. हा प्रस्ताव आर्थिक मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Goa Electricity
गोव्यातही लोडशेडिंग! उद्योग चालू ठेवण्यासाठी उद्योजकांचा संघर्ष कायम

गोव्यातील (Goa) लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग कोरोनानंतर सावरत असतानाच रोजच्या वीज कपातीमुळे उद्योगांना आणखी एक धक्का बसला आहे. उन्हाळ्यात विजेच्या वापरात होणारी वाढ आणि राष्ट्रीय वीजटंचाई यामुळे राज्यातील उद्योगांवर लोडशेडिंगची टांगती तलवार असल्याचं चित्र आहे. सर्वाधिक वीज दर भरुनही उद्योगांना कमीत कमी प्राधान्य मिळते आणि दररोज पाच ते अकरा तास वीज कपात सहन करावी लागते, अशी खंत उद्योजकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान वीज दरवाढीचा फटका केवळ उच्च दाबाची वीज वापरणार्‍यांना होत असून उद्योजक वाढीव दर देण्यास तयार असल्याचं गोवा राज्य इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com