CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Reshuffle: गोमंतकीय माझ्‍या‍सोबत, नेतृत्व बदलाची काय गरज? मुख्‍यमंत्री स्पष्टच बोलले; मंत्रिमंडळ फेरबदलावर शिक्कामोर्तब

CM Pramod Sawant: राज्यात नेतृत्व बदलाची गरजच नाही. तशी कोणतीही परिस्थिती राज्यात उद्‍भवलेली नाही. आमदार व गोमंतकीय आपल्यासोबत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात नेतृत्व बदलाची गरजच नाही. तशी कोणतीही परिस्थिती राज्यात उद्‍भवलेली नाही. आमदार व गोमंतकीय आपल्यासोबत आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले. मंत्रिमंडळ फेरबदल होणार यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले.

ते म्हणाले, भाजप (BJP) हा राष्ट्रीय पक्ष आहे. नेतृत्वाविषयी त्यांनी एकदा निर्णय घेतला की तो बदलला जात नाही. दुसरे म्हणजे मंत्रिमंडळ फेरबदलावेळी मी माझ्या नेत्यांचे म्हणणे जाणून घेणारच आहे. खातेबदल होणार की नाही, किती मंत्री बदलले जातील या प्रश्नांना मात्र त्यांनी मंत्रिमंडळ फेरबदल होणार यातच सारे आले असे सांगून बगल दिली. ते म्हणाले, भाजप हा केंद्रीय पक्ष आहे. राज्यातील निर्णय हे केवळ राज्यातून घेतले जात नाहीत. त्यामुळे केंद्राचा सल्ला घ्यावा लागतो. नेतृत्वाबाबतचा निर्णय हा वरिष्ठ घेतील. दुसरीकडे, मंत्रिमंडळ फेरबदल होणार हे निश्चित. मात्र, ते कधी होणार हे सध्या सांगू शकत नाही.

कर्मचारी निवड आयोग गोव्यात (Goa) आता कधीच बंद होणार नाही. नोकऱ्यांमध्ये पारदर्शक निवड व्हावी यासाठी केंद्र सरकाचाही यावर भर आहे. त्यामुळे गोव्यात आम्ही कर्मचारी निवड आयोगामार्फतच भरती करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसारच आयोग स्थापन केला आहे. परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी निकाल येतो आणि नोकरी मिळते याचा अनुभव गोमंतकीयांनी घेतला आहे. यापुढे साऱ्या नोकऱ्या गोवा लोकसेवा आयोग आणि गोवा कर्मचारी भरती आयोग या माध्यमातूनच दिल्या जातील. केवळ गुणवत्तेवर नोकरी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

‘नोकरी घोटाळ्यातील कोणालाही सोडणार नाही’

नोकऱ्यांचा घोटाळा आपणच उघडकीस आणला. पहिली तक्रार आपणच नोंदवण्यास सांगितली याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, जनतेने तक्रार देण्यासाठी आताही पुढे यावे. तक्रारीत राजकारण्याचे वा कोणाचेही नाव आल्यास त्याच्याविरोधात कारवाई होणारच. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ज्यांनी नोकऱ्यांसाठी पैसे घेतले त्यांच्याकडून पैसे, सोने जप्त केले आहेत. हे प्रकरण न्यायालयात असून आम्ही या प्रकरणात अडकलेल्यांना सोडणार नाही. तक्रारीविरोधात चौकशी करायला हवीच. या आमदाराने पाच लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची आधीच चौकशी व्हायला हवी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT