Goa Assembly CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: ‘मोपा’वरील महसूल ३१ मार्चपासून नाही; मुख्यमंत्र्यांची दुरुस्ती

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: कामकाज सुरू झाल्यानंतर आपल्याला एक निवेदन करायचे आहे असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ही दुरुस्ती केली

गोमन्तक डिजिटल टीम

मोपा विमानतळ प्रकल्पातून सरकारला ७ डिसेंबर २०२४ पासून महसूल मिळण्यास सुरवात होईल, अशी यापूर्वीच्या उत्तरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुरुस्ती केली. विधानसभेचे कामकाज आज सुरू झाल्यानंतर आपल्याला एक निवेदन करायचे आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ही दुरुस्ती केली.

मुख्यमंत्री म्हणाले, याआधी ५ फेब्रुवारी २०२३, ५ मार्च २०२३, १८ जुलै २०२३, ५ फेब्रुवारी २०२४ रोजी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना तसेच अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना मोपा विमानतळ प्रकल्पातून ३१ मार्च २०२४ पासून महसूल मिळण्यास सुरवात होईल, अशी चुकीची माहिती दिली होती. त्याऐवजी ७ डिसेंबर २०२४ पासून महसूल मिळण्यास सुरवात होणार आहे. सर्व ठिकाणच्या यासंदर्भातील नोंदी दुरुस्त करण्यात याव्यात.

याविषयावरून यापूर्वी सरकारला लक्ष्य करण्यात आले होते. कोविड काळात प्रकल्प रेंगाळल्याने प्रकल्पातून महसूल देण्यास विलंब करण्यास परवानगी प्रकल्प प्रवर्तक कंपनीने मागितली होती. कंपनीची ती विनंती मान्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपण यापूर्वी दिलेल्या चुकीच्या माहितीत विधानसभेत दुरुस्ती करू, असे म्हटले होते. त्यानुसार त्यांनी आज बरोबर माहिती देणारे निवेदन विधानसभेत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT