डिचोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर संकल्पनेअंतर्गत गोवा राज्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी राज्य सरकारने वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. चतुर्थी बाजारही त्याचाच भाग असून, चतुर्थी बाजाराच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. प्रत्येक नागरिकाने राज्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे व्यक्त केले.
राज्य सरकारच्या योजनेंतर्गत साखळी येथे ''स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार''चे शनिवारी (ता.२०) उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. कदंब बसस्थानक परिसरात हा बाजारभरविण्यात आला आहे. याप्रसंगी साखळी पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगरसेवक यशवंत माडकर, दयानंद बोरयेकर, शुभदा सावईकर आदी नगरसेवक तसेच नवनिर्वाचित पंच आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.
बाजार कोठे?
फोंडा : बाजारपेठे मागील एअरपोर्ट रोड,
कपिलेश्वर मंदिराजवळील रथमळ मैदान,
वाळपे - शिरोडा कदंब बस स्थानक,
मुरगाव : वास्को आणि सांकवाळ कदंब बस स्थानक,
डिचोली : शिरोडकर सभागृह आणि पालिका सभागृह,
पेडणे : कदंब बस स्थानक,
बार्देश : म्हापसा नवीन कदंब बस स्थानक,
आसगाव गणेश मंदिराजवळ,
अस्नोडा कदंब बस स्थानक
तिसवाडी : मळवाल - आगशी,
ताळगाव - कासा दी पोवो
सत्तरी : होंडा कदंब बस स्थानक,
वाळपई : कदंब बस स्थानक,
धारबांदोडा : क्रीडा मैदान
सांगे : सांगे पालिका कॉम्प्लेक्स.
सासष्टी : मडगाव आणि कुंकळ्ळी कदंब बस स्थानक
काणकोण : काणकोण बस स्थानक,
पैंगीण : श्रद्धानंद स्कूल इमारत,
केपे : कुडचडे जीसुडा येथील मैदान.
बाजारात विविध स्टॉल
साखळी येथील चतुर्थी बाजारात चतुर्थीसाठी लागणाऱ्या करंज्या आदी खाद्यपदार्थ तसेच अन्य स्टॉल थाटण्यात आले आहेत. 30 ऑगस्टपर्यंत हा बाजार चालू राहणार आहे. फित कापून आणि समई प्रज्वलीत करून उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी चतुर्थी बाझाराची पाहणी केली. बाराही तालुक्यात अशाप्रकारचे चतुर्थी बाझार भरविण्यात आले आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.