CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

केंद्राच्या साहाय्याने राज्यात ‘क्रूझ टर्मिनल’ला प्रोत्साहन

मुख्यमंत्री प्रमोद सावंत : आयुष मंत्रालयामार्फत लवकरच विविध योजना

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील पर्यटन वाढीसाठी ‘क्रूझ टर्मिनल’ला प्रोत्साहन देण्यात येईल. यासाठी केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळेल अशी आशा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय जहाज, बंदर, जलमार्ग आणि आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, आज केंद्रीय जहाज, बंदर, जलमार्ग आणि आयुषमंत्री सोनेवाल यांच्याशी विविध विषयांवर झालेली चर्चा फलदायी ठरली आहे. राज्यात जहाज, बंदर आणि जलमार्ग मंत्रालयाशी संबंधित विविध कामे सुरू आहेत. यातील सागरमाला अंतर्गत येणाऱ्या कामांनाही प्रोत्साहन देण्यात येणार असून पणजी आणि वास्को येथे ‘क्रूझ टर्मिनल’ उभा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

याशिवाय आयुष मंत्रालयाच्यावतीने देशातील पहिले आणि सर्व सोयींनी युक्त रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून जूनपर्यंत ते पूर्ण करण्यात येईल याचा राज्यातील जनतेला कसा उपयोग करता येईल यासाठीही प्रयत्न केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार होता. त्यावेळी कोलवाळ येथे या मंत्रालयाकडून पहिले अत्याधुनिक सोयीचे रुग्णालय उभे करण्यात येत आहे. हे रुग्णालय जून महिन्याच्या सुरवातीपासून राज्यातील जनतेसाठी उपलब्ध करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते सुरू झाल्यास आयुर्वेदच्या उपचार पद्धती सुरू होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

VIDEO: चौकाराच्या गैरसमजात तिलक वर्माने गमावली विकेट! पिचवरच थांबला अन् झाला रनआऊट, विंडीजच्या खेळाडूंना हसू आवरेना; गंभीर भडकला

SCROLL FOR NEXT