CM Pramod Sawant Casts his Vote for President Election Dainik Gomantak
गोवा

Presidential Polls 2022 : सर्वोच्च पदासाठी आज गोव्यात मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दोन्हीही गटाकडून सतर्कता बाळगत मोर्चेबांधणी 

दैनिक गोमन्तक

पणजी : देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक होत आहे. सत्ताधारी ‘एनडीए’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत आहे. निवडणुकीसाठी पर्वरी विधानसभा संकुलाच्या तळ मजल्यावर विशेष मतदान कक्ष उभारण्यात आला आहे. राज्यातील आमदार, खासदार येथे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील 776 खासदार, देशातील सर्व विधानसभांचे 4033 आमदार असे एकूण 4809 मतदार मतदान करतील.

दोन्हीही गटांकडून मोर्चेबांधणी

क्रॉस मतदान होऊ नये सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. काँग्रेसने आपले आमदार फुटू नयेत यासाठी पाच आमदारांना चेन्नईला हलवले होते. काँग्रेसचे इतर सहा आमदार राज्यातच असून त्यांची मते यूपीएला मिळणार नाहीत असे पक्षाने गृहीत धरले आहे. भाजपचे 20, मगो पक्षाचे 2 आणि 3 अपक्ष आमदार सकाळी हे विधानभवनात जाऊन मतदान केल्यावर विधानसभेच्या कामकाजात भाग घेतील.

राज्यातील 40 आमदार करणार मतदान

पर्वरी विधानसभा संकुलात तळमजल्यावर लोकलेखा  समिती (पीएसी) कक्षेजवळील रूम नंबर 15 मध्ये विशेष मतदार कक्ष उभारण्यात आला आहे. यासाठी पोलिस, विधानसभा सुरक्षा यंत्रणा व राखीव पोलीस दलाची सुरक्षा आहे. या ठिकाणी निवडणुकीत राज्यातील 40 आमदार सहभाग घेत आहेत. राज्यातील 2 लोकसभा खासदार आणि 1 राज्यसभा खासदार हे दिल्लीत संसद भवनामध्ये मतदान करण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa News Live Updates: अनमोड घाटातील रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम शक्य

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

SCROLL FOR NEXT