CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : दर्जेदार सेवांद्वारे स्वयंपूर्ण गोवा बनवण्याचे ध्येय

मुख्यमंत्री सावंत ः सत्तरीचा विकास हाच राणेंचा ध्यास; पैकुळ येथील पुलाचे उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील जनतेला दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून राज्याला ‘स्वयंपूर्ण गोवा’बनवण्याचे आपले ध्येय आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केले. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे सत्तरीचा विकास करत आहेत. सत्तरीचा विकास हाच ध्यास बाळगून ते अहोरात्र झटत आहेत. अवघ्या नऊ महिन्यात पैकुळवासीयांसाठी सुसज्ज असा नवा पूल उभारण्यात आला. हे स्वप्न राणे यांच्यामुळेच साकार होऊ शकले,असेही ते म्हणाले.

पैकुळ पुलाचे उद्‍घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत बोलत होते.आता सावर्डे सत्तरीवासीयांसाठी लवकरच नवीन पूल उभारण्यात येईल आणि याची निविदा काढून अवघ्या दोन-तीन महिन्यातच पायाभरणी करून काम हाती घेण्यात येणार आहे,असेही त्यांनी सांगितले. टाटा मेमोरियल हॉस्पिटलशी करार करून कॅन्सरवरील उपचार राज्यात आणण्याच्या घोषणेमुळे अनेकांना मदत होईल, असे सांगून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पर्ये आमदार डाॅ. दिव्या राणे, जीएसआयडीसीचे अध्यक्ष केदार नाईक, नगराध्यक्ष शैहजीन शेख, विनोद शिंदे, गुळेली सरपंच नितेश गावडे, पंच संतोषी नाईक, पिसुर्ले सरपंच देवानंद परब, भिरोंडा सरपंच उदयससिंह राणे, नगरगाव सरपंच संध्या खाडीलकर, खोतोडा सरपंच नामदेव राणे तसेच इतर पंच, सरपंच उपस्थित होते.यावेळी पैकुळवासीयांतर्फे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार डाॅ. दिव्या राणे यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.

विकासाचा ध्यास ः विश्वजीत राणे

सत्तरीची जनता ही माझी ताकद आहे. पैकूळ पूल आमच्या प्रयत्नांचा केवळ एक पैलू आहे आणि आमच्या लोकांना सर्वोत्तम सेवा आणि संधी मिळाव्यात यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत राहू. सत्तरीचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे,असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.पैकूळ पूल हा कनेक्टिव्हिटी, प्रगतीसाठी महत्त्वाचा दुवा ठरेल.हा पूल कार्यान्वित केल्याबद्दल मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आभारी आहे, ज्यामुळे सत्तरीतील लोकांच्या ‘कनेक्टिव्हिटी’ मध्ये लक्षणीय वाढ होईल,असेही ते म्हणाले.

पुलाची स्वप्नपूर्ती ः

डॉ. दिव्या राणे सत्तरीत भव्य असा ऐतिसाहिक पूल अल्पावधीत पूर्ण झाला आहे. ते फक्त डबल इंजिन सरकारमुळेच हे स्वप्न साकार होऊ शकले. पुलामुळे अनेक गाव जोडले जातात.त्यामुळे खऱ्या अर्थाने गावचा विकास होतो. पर्ये मतदारसंघात पाली रस्ता, नानेली रस्ता, पाली जांभळीचे तेंब या प्रकल्पामुळे अनेकांना फायदा होऊ लागला आहे. १२ कोटी रुपये खर्च करून हा भव्य असा पूल अवघ्या नऊ महिन्यात उभारला आहे. २०२१ मध्ये आलेल्या पुरात पैकुळ पूल वाहून गेला होता. त्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रयत्नांनी हा नवा पूल पूर्ण करण्यात आला,असे आमदार डॉ.दिव्या राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT