CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Governance: 'गोमंतकीयांच्या समस्या आता AI सोडवणार'! मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच; 90% तक्रारींचा 2 दिवसांत निवारणाचा दावा

CM Pramod Sawant: सार्वजनिक गाऱ्हाणी संचालनालय आणि संकेतस्थळाच्या उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी संचालक प्रसाद वळवईकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अनेक नागरिक आपली गाऱ्हाणी समस्या घेऊन जनता दरबाराच्यावेळी येतात, परंतु तंत्रज्ञानाचा वापर करत, मुख्यमंत्री हेल्पलाईन आणि सार्वजनिक गाऱ्हाणी खात्याच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्‍न सुटावेत यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

सार्वजनिक गाऱ्हाणी संचालनालय आणि संकेतस्थळाच्या उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी संचालक प्रसाद वळवईकर व इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, आमचे सरकार हे नागरिक केंद्रीत प्रशासनावर भर देत असून नागरिकांचे प्रश्‍न शक्य तेवढ्या लवकर सुटावेत यासाठी पहिल्यांदाच ‘एआय’चा वापर करण्यात येत आहे.

सरकारने सुरू केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विविध योजनांचा लाभ घ्यावा, त्यांची कामे सुरळीतपणे व्हावी हा यामागचा उद्देश आहे. जो ॲप तयार करण्यात आला आहे तो सरकारच्या विविध योजनांची माहिती पुरविण्यासाठी आहे.

ज्यावेळी मुख्यमंत्री हेल्पलाईन क्रमांक १९०५ वर संपर्क केला जातो त्यावेळी ९० टक्के गाऱ्हाणी किंवा तक्रारींचे दोन दिवसांत निवारण करण्यात येते. उर्वरित १० टक्के समस्या दोन खात्यांतर्गत किंवा इतर असतात त्यादेखील ५ दिवसांत सोडविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hyderabad Accident: हैदराबाद आऊटर रिंग रोड रक्तानं माखला! भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील 3 बालकांसह 6 जणांचा मृत्यू

Hormuz Strait Blockade Conflict: "इराणला मातीत गाडू!" ट्रम्प यांना संताप अनावर, पाकिस्तानमार्गे पाठवलेला प्रस्ताव लावला धुडकावून; होर्मुजची नाकेबंदी कायम

Horoscope 2 may 2026: पगारवाढ ते नवं घर! शनिदेवाच्या कृपेनं 'या' राशींची होणार भरभराट; लव्ह लाईफमध्येही येणार नवा गोडवा

अस्नोड्यात ओव्हरटेकिंगच्या वादातून राडा; दुचाकीस्वाराला बेदम मारहाण! भररस्त्यात घडलेला थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Nepal Jeep Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात! भाविकांची जीप 700 मीटर खोल दरीत कोसळली; 20 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT