Hyderabad Accident: हैदराबाद आऊटर रिंग रोड रक्तानं माखला! भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील 3 बालकांसह 6 जणांचा मृत्यू

Outer Ring Road Car Crash: भरधाव कारने नियंत्रण सुटल्यामुळे या लॉरीला जोरदार धडक दिली. या कारमध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्य प्रवास करत होते.
Outer Ring Road Car Crash
Hyderabad AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Hyderabad ORR Accident 6 Dead: हैदराबादमध्ये शुक्रवारी (1 मे) एक अत्यंत भीषण अपघात घडला. शहरातील आऊटर रिंग रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला मागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारमधील सात प्रवाशांपैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. मृतांमध्ये एका महिलेसह तीन बालकांचा समावेश असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला उभी असलेली लॉरी ही त्यावरील मालाला बांधलेल्या दोऱ्या घट्ट करण्यासाठी थांबवण्यात आली होती. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव कारने नियंत्रण सुटल्यामुळे या लॉरीला जोरदार धडक दिली. या कारमध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्य प्रवास करत होते. हे कुटुंब यादद्रि-भुवनगिरी जिल्ह्यातील एका मंदिरात दर्शन घेऊन आपल्या संतनगर येथील घरी परतत असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत एका महिलेचा जीव वाचला असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Outer Ring Road Car Crash
Nepal Jeep Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात! भाविकांची जीप 700 मीटर खोल दरीत कोसळली; 20 जणांचा जागीच मृत्यू

पोलीस तपासानुसार, अपघातातील (Accident) मृत आणि जखमी हे राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील सिरसिल्ला शहराचे रहिवासी होते. मृतांमध्ये सिरसिल्ला येथील एका स्थानिक बीआरएस (BRS) नेत्याच्या भावाच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष आणि सिरसिल्ला मतदारसंघाचे आमदार के. टी. रामाराव (KTR) यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी पीडित कुटुंबाशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले असून या कठीण प्रसंगी कुटुंबाला आधार देण्याचे आश्वासन दिले. या भीषण अपघातामुळे सिरसिल्ला शहरावर शोककळा पसरली असून महामार्गावरील वेग मर्यादेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com