Goa Cm At Canacona
Goa Cm At Canacona  Dainik Gomantak
गोवा

Canacona : गरिबांना घर उभारणीसाठी सर्वतोपरी मदत, मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

दैनिक गोमन्तक डिजिटल

Canacona : गरिबांच्या प्रत्येक घराला राज्य सरकारच्या वतीने मदत करण्यात येईल. शिवाय प्रत्येक घराच्या उभारणीसाठी वैयक्तिक मदत करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज काणकोण येथे दिले. श्रम-धाम योजनेअंतर्गत गरिबांसाठी घरकुल उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काणकोण येथे पायाभरणी सोहळा झाला.

समाजातील एकदम शेवटच्‍या नागरिकाचा उद्धार करणे हे भाजपचे तत्त्‍व आहे. याच मुशीतून कार्यकर्ते तयार झाल्याने अंत्योदय तत्वावरच गरिबांच्या डोक्यावर छप्पर निर्माण करून देण्याची श्रम-धाम संकल्पना आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

यावेळी सभापती रमेश तवडकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरचिटणीस नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक, सर्वानंद भगत, नगराध्यक्ष रमाकांत नाईक, उपनगराध्यक्ष लक्ष्मण पागी, नगरसेवक सायमन रिबेलो, नितू देसाई, अनिता पागी, सुप्रिया देसाई, गंधेश मडगावकर, हेमंत नाईक गावकर, सारा देसाई, खोतीगावचे आनंदु देसाई, आगोंदच्या सरपंच फातिमा रॉड्रिग्ज, श्रीस्थळच्या सरपंच सेजल गावकर, लोलयेच्या सरपंच प्रतिजा बांदेकर, भाजप मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष वृंदा सतरकर, उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर, पाळोळे येथील सुजाता पागी आदी उपस्थित होते.

ज्या कुटुंबांना शासकीय योजनेचा मागमूस नाही, अशा कुटुंबांना लोकसहभागातून सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. येत्या चार वर्षांत काणकोण मतदारसंघात एकही माणूस छपराविना असणार नाही.

हीच तळमळ घेऊन बलराम चॅरिटेबल फाऊंडेशनची निर्मिती करण्‍यात आली आहे. ज्या पालकांना आपल्या पाल्यांची फी देणे शक्य नसल्याने शिक्षण देता येत नाही, त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न फाऊंडेशनचा आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय साहाय्य देण्‍याचेही ध्येय असल्याचे तवडकर यांनी सांगितले.

सभापती तवडकर यांनी श्रमदान करून घर उभारणीचा आदर्श राज्यापुढे ठेवला आहे असे नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. तर, प्रत्येक आईला व बापाचे आपल्या मुलांसाठी घरकुल असावे असे स्वप्न असते.

ते स्वप्न साकार करण्याची संकल्पना सभापती तवडकर यांच्या डोक्यात आली. त्यासाठी त्‍यांना सलाम करायला हवा, असे भाजप प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक यांनी सांगितले. दरम्यान, मिरज येथील बीपीएड महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक काळे यांनी एक घर बांधून देण्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे मिरज येथील दुसऱ्या वर्गमित्रानेही आणखी एका घरासाठी निधी देण्याचे जाहीर केले.

लोकसहभागातून घरांची उभारणी

ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, घरातील मुख्‍य आधार गेला आहे, कुणाचे सर्वच कुटुंब अपंगत्वाने ग्रासले आहे, अशा रहिवाशांना घरे उभारून देण्याचा प्रयत्न तवडकर यांनी चालविला आहे. या प्रयत्नातून त्यांनी ३३ दिवसांच्या अल्पकालावधीत खोतीगाव व गावडोंगरी पंचायत क्षेत्रात प्रत्येकी एक घर उभारले आहे.

आता त्यांनी बलराम चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून मे महिन्यापर्यंत प्रथम 14 व नंतर 100 घरे उभारण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक रूपया व एक दिवस श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक घरासाठी 8 ते 10 लाख रूपये खर्च येणार आहे. गावकीची भावना पुन्हा रूजविण्याचा प्रयत्न असल्याचे तवडकर म्‍हणाले.

परप्रांतीय स्थिरावले पण..

गोवा मुक्तीनंतर अन्य राज्यांतून गोव्यात जे आले, ते येथे स्थिरस्थावर झाले. त्यांना नोकऱ्याही मिळाल्या. मात्र, गावातील लोक आहे त्याच स्थितीत आहेत. याची जाणीव झाल्यानेच ‘स्वयंपूर्ण गोवा’ ही योजना चालीस लावली. सरकारच्या कल्याणकारी योजना कार्यकर्त्यांनी गरजूंपर्यंत पोहोचवण्याची गरज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रदूषणमुक्त उद्योग आणणार

काणकोणात पायाभूत सुविधा 90 टक्के पूर्ण झाल्या आहेत. तालुक्यातील मनुष्यबळ काणकोणातच राहावे, यासाठी प्रदूषणमुक्त उद्योग आणू. 2024 साली लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Pakistan Road Accident: पाकिस्तानात भीषण अपघातात, 20 ठार 15 जखमी; बचावकार्य सुरु

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

SCROLL FOR NEXT