Tablet Distribution to Govt. Schools Dainik Gomantak
गोवा

Goa News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप

CM Pramod Sawant: आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा: आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप करण्यात आले. या टॅबलेट वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणले की राज्यात सध्या अनुदानित शाळांपेक्षा सरकारी शाळांना प्राधान्य दिले जात आहे, आणि यातून सरकारी शाळांकडे बघण्याची दृष्टी बदलत असल्याचा प्रत्यय येतो.

सरकारकडून नेहमीच सरकारी शाळांची वाढ व्हावी म्हणून प्रयत्न केले जातात आणि आता अधिकाधिक विद्यार्थ्यांचा कल सरकारी शाळांकडे झुकलेला पाहता या प्रयत्नांना यश मिळताना दिसते.

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केलेले स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप ही राज्यातील टेक्नॉलॉजिकल प्रगती म्हटली आहे. विद्यार्थ्यांमधील डिजिटल कौशल्ये सुधारावीत म्हणून हा उपक्रम महत्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

टेक्नॉलॉजी ही बदलत्या शिक्षण पद्धतींमधला महत्वाचा टप्पा आहे आणि हीच टिक्नॉलॉजी ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी इन्फोसिस स्प्रिंगबोर्डचे कौतुक केले. या टेक्नॉलॉजीमुळे विद्यार्थ्यांना नवीन स्वप्न बघण्याची प्रेरणा मिळणार आहे तसेच राज्यातील विद्यार्थ्यांनी नेहमीच करियरच्या नवनवीन संधी शोधात राहाव्यात असे म्हणत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT