Rahul Mhambare News, Goa AAP News Dainik Gomantak
गोवा

'भंडारी समाजाचा मुख्यमंत्री ही कल्पना महागात पडली'

याच कारणासाठी ‘आप’शी फारकत घेतल्याचं राहुल म्हांबरे यांचं स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी : आम आदमी पक्षाने भंडारी समाजाचा नेता मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणे चूक होते. त्यामुळेच मी अस्वस्थ बनलो आणि त्याच कारणासाठी पक्षाशी फारकत घेतली आहे, असे मत या पक्षाचे भूतपूर्व निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी व्यक्त केले. (Rahul Mhambare News)

एका वेबपोर्टलशी बातचित करताना राहुल म्हांबरे पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या (Election) काळात मी या प्रकाराविरोधात पक्षाच्या नेत्यांकडे अस्वस्थता व्यक्त केली होती. परंतु त्याबाबत मी जाहीरपणे बोललो नाही; कारण पक्षात फूट पडली असती. ‘अमूकच जातीचा मुख्यमंत्रिपदाचा (CM) उमेदवार जाहीर करणे आम आदमी पार्टीला महागात पडले. अनेकजण त्यामुळे रागावले व बुद्धिवादीसुद्धा या पक्षापासून दूर गेले.’ असंही ते म्हणाले.

राहुल म्हांबरे म्हणाले, पक्षाने अनेक योजना जाहीर केल्या होत्या. वीज आणि पाणीपट्टी कमी करणे, तीर्थयात्रा अशा काही योजना होत्या. परंतु भंडारी समाजाचा मुख्यमंत्री ही कल्पना लोकांना रुचली नाही. त्यामुळे या योजनांनाही यश मिळाले नाही.

मी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनापासून आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) विचारांबरोबर आहे. मी फारकत घेतल्यानंतर काही पक्षांनी मला आमंत्रणही दिले आहे. परंतु मी सध्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याच्या विचारात नाही. आम आदमी पक्षाने आपल्या संकल्पना पुढे घेऊन जाव्यात. तूर्तास मी मागे बसून त्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवणार आहे, असे राहुल म्हांबरे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT