Rohan Khuante Dainik Gomantak
गोवा

Rohan Khuante: हरित पर्यटनासाठी स्वच्छता महत्त्वाची

दैनिक गोमन्तक

Rohan Khuante: समुद्रकिनारे आणि आपल्या सभोवतालची पर्यटन स्थळे स्वच्छ राखणे पर्यटन राज्यासाठी महत्त्वाचे ठरते. जेव्हा आपण हरित शाश्वत पर्यटन आणि हरित गुंतवणुकीबद्दल बोलतो तेव्हा स्वच्छतेची भूमिका महत्त्वाची असते, असे विचार पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले.

रविवारी पर्यटन संचालक सुनीलकुमार अंचिपाका आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत पर्यटन विभाग आणि आयटी विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मिरामार समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवली. दरम्यान, खंवटे यांनी पेन्ह डी फ्रँका आणि सुकूर पंचायत क्षेत्रांनाही भेट दिली.

जिथे मंत्र्यांसह स्थानिक पंच सदस्यांनी स्वच्छता उपक्रम राबवला. खंवटे येथे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी एक तास देण्याचे दिलेले आवाहन हे उदात्त कार्य असून आपला परिसर स्वच्छ व कचरामुक्त ठेवणे हे प्रत्येकाचे काम आहे. गणेश विसर्जनानंतर पंच सदस्यांनी गावात मूर्ती विसर्जन स्थळ स्वच्छ केल्याचेही खंवटे यांनी इथे नमूद केले.

वेळूस येथील मंदिर परिसराची स्वच्छता- डॉ. के. ब हेडगेवार हायस्कूलतर्फे वेळूस येथील रवळनाथ मंदिराजवळील परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी व्यवस्थापन समितीचे सचिव प्रकाश गाडगीळ, सदस्य राजाराम सांड्ये, मुख्याध्यापिका निलांगी शिंदे व इतर शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापिका निलांगी शिंदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

साळ पंचायतीने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानाला मोठा प्रतिसाद लाभला. महादेव मंदिर, चव्हाटेश्वर मंदिर, कुलदैवत मंदिर, भूमिका मंदिर व रस्ता परिसरातील कचरा हटवण्यात आला. यात सरपंच सावित्री घाडी, पंच नीता राऊत, मनोहर शिंदे , सचिव पुंडलिक गवस, शांबा घुरे, सर्वेश चांदेलकर, आनंद राऊत तसेच डॉ. गौरेश नाईक, अंजली धर्णे सहभागी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

SCROLL FOR NEXT