Goa Beach | Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

'इथे भारतीय येत नाहीत म्हणून स्वच्छता आहे'! गोव्यातील बीचेसबाबतीत सोशल मीडियावर रंगली चर्चा; नेटकऱ्यांच्या धमाल कमेंट्स वाचा..

Goa Beach Tourism: संबंधित युजरने आपल्या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, गोव्यात अजूनही काही सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत, जिथे पाणी पारदर्शक आहे आणि वातावरण शांत आहे.

Sameer Panditrao

गोव्यातील स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांबाबत सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. एका युजरने केलेल्या पोस्टमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला असून, नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

संबंधित युजरने आपल्या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, गोव्यात अजूनही काही सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत, जिथे पाणी पारदर्शक आहे आणि वातावरण शांत आहे. विशेष म्हणजे, या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक दिसून येतात.

युजरने प्रश्न उपस्थित केला आहे की भारतीय पर्यटक बहुतेक वेळा कळंगुट, बागा आणि कांदोळीमसारख्या गर्दीच्या बीचवरच का जातात? त्यांना स्वच्छ आणि शांत किनाऱ्यांची माहिती नाही का, की त्यांना गर्दीच आवडते? या मुद्द्यावर अनेकांनी आपली मते मांडली आहेत.

काहींनी मान्य केले की माहितीच्या अभावामुळे असे होते, तर काहींनी भारतीय पर्यटकांच्या सवयींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, पोस्टमध्ये बीचवर गाड्या चालवणे, भटकी कुत्री आणि अस्वच्छता यासारख्या समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

काही नेटकऱ्यांनी मत व्यक्त केले की, जिथे भारतीय पर्यटकांची संख्या कमी आहे, ते किनारे तुलनेने अधिक स्वच्छ राहतात. या चर्चेमुळे पर्यटन संस्कृती आणि जबाबदारीबाबत नव्याने विचार करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT