Asha Parekh Dainik Gomantak
गोवा

Margao News : शास्त्रीय संगीत लोप पावतेय! आशा पारेख यांची खंत

‘कलांगण’ संस्थेने कला व संस्कृती खाते व रवींद्र भवन मडगावच्या सहकार्याने आयोजित पाच दिवसीय २१व्या कलारंग महोत्सवाचे उदघाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News : सासष्टी, शास्त्रीय नृत्य व संगीत हीच भारताची परंपरा आहे. पण बॉलिवूडमधील नृत्ये प्रेक्षकांना आवडू लागली आहेत. भारतीय नृत्य व शास्त्रीय संगीत परंपरा लोप पावत चालली आहे,

अशी खंत व्यक्त करून शास्त्रीय नृत्य व संगीत शिकणे कठीण असले तरी या दोन्ही कला जागृत ठेवणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित, पद्मश्री सिनेअभिनेत्री तथा निर्मात्या आशा पारेख यांनी केले.

‘कलांगण’ संस्थेने कला व संस्कृती खाते व रवींद्र भवन मडगावच्या सहकार्याने आयोजित पाच दिवसीय २१व्या कलारंग महोत्सवाचे उदघाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या.

या सोहळ्याला कला व संस्कृती तसेच क्रीडा मंत्री गोविंद गावडे प्रमुख पाहुणे, मडगावचे आमदार दिगंबर कामत सन्माननिय अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या सन्मान करण्यात आला.

मुंबईपेक्षा गोव्यात नृत्य व संगीताला वाढती मागणी आहे, ही चांगली गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.

आमदार दिगंबर कामत यानी जानेवारी महिन्यात मडगावात आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव आयोजित केला जाईल, याचा पुनरुच्चार केला.

रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी स्वागत केले.कलांगणाचे अध्यक्ष राजीव शिंक्रे यांनी आभार मानले.

उदघाटन सोहळ्यानंतर मूळ गोमंतकीय पण सध्या मुंबईत स्थायिक झालेले युवा व्हायोलिन वादक मिलिंद रायकर यांनी ‘कलर्स ऑफ व्हायोलिन’ हा व्हायोलिन सिंफनी ऑर्केस्ट्रा सादर केला.

ज्या ज्या कलाकारांनी त्याग करून कला आत्मसात केली, जोपासली तेच जगाच्या पाठीवर चमकत आहेत. गोव्यात प्रतिभा पुष्कळ आहे पण त्याग करण्याची तयारी नसल्याने गोव्यात कलाकार निर्माण होत नाहीत

.एखाद्याला कलाकार म्हणून करिअर करायचे असेल तर सरकार त्याच्या संपूर्ण खर्च करायला तयार आहे. पण त्यासाठी त्याने त्यागी भावनेने मेहनत केली पाहिजे.

-गोविंद गावडे, कला व संस्कृती मंत्री

आज पं.व्यंकटेश कुमार यांचे गायन

उद्या दि. १३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पं.व्यंकटेश कुमार यांचा गायनाचा कार्यक्रम होईल व नंतर ७.३० वाजता स्मिता महाजन, अलका लाजमी व कलांगणच्या विद्यार्थ्यांचा भारतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.

कला रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा,असे आवाहन कलांगणच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरुशिष्य परंपरेशिवाय भारतीय संगीताला पर्याय नाही. परंपरेमुळे शास्त्र, तंत्र, विद्या व कला या चारही अंगाचा विकास होत असतो. गोव्यातील मातीतून असा एखादा परिपूर्ण कलाकार व्हायला पाहिजे, जो प्रथम शिष्य व नंतर गुरु व्हावा.

- पं.सुरेश तळवलकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT