काँग्रेस पक्षाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष आलेक्स सिक्वेरा (Alex Sequeira ) Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: माझ्यावर केलेला तो आरोप बिनबुडाचा: आलेक्स सिक्वेरा

मी पोर्तुगीज नव्हे, भारतीय नागरिकच आहे 'आलेक्स सिक्वेरा' यांचे स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

सासष्टी: माझ्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट आहे व मी पोर्तुगीज नागरिक असा जो आरोप फ्रॅंकी डिमेलो नामक इसमाने केला आहे, त्यात मुळीच तथ्य नाही. माझ्याकडे भारतीय पासपोर्ट आहे व मी भारताचा नागरिक आहे. ज्याने हे आरोप केले आहेत ते कुणाच्या सांगण्यावरून, असे काँग्रेस पक्षाचे (Goa Congress party) राज्य कार्यकारी अध्यक्ष आलेक्स सिक्वेरा (Alex Sequeira) यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

नुवेच्या आमदाराने (Goa MLA) हे आरोप केले असते, तर मी समजू शकलो असतो, परंतु या इसमाला माझ्यावर हे खोटे आरोप करण्याचा अधिकारच नाही किंवा त्याने पुरावेही सादर केले नाहीत. त्यांचा केवळ मला निवडणूक (Goa Election) लढविण्यापासून दूर ठेवणे हा एक कलमी उद्देश असावा असे आपल्याला वाटते, असेही सिक्वेरा यांनी सांगितले.

मी पोर्तुगीज नागरिक असतो, तर 2007 ते 2012 या कालावधीत मी मंत्रीच झालो नसतो. मी आमदार व मंत्री असताना अनेकांना नोकऱ्या दिल्या व त्यांच्याकडून एका पैशाचीही अपेक्षा ठेवली नाही. माझी पोर्तुगालमध्ये कोणत्याही प्रकारची मालमत्ता नाही. गोवा सोडून इतर कुठेही तसेच मांडवी नदीच्या पलिकडेसुद्धा माझी किंवा माझ्या कुटुंबाची मालमत्ता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT