स्वस्त धान्य दुकान Dainik Gomantak
गोवा

नागरी पुरवठा खाते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, स्वस्त धान्य दुकानांतून चक्क सडलेल्या तांदळाचे वाटप

संचालकांची कबुली : दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

कुठ्ठाळ्ळी येथील नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून स्वस्त धान्य दुकानधारकांना किडलेल्या तांदळाचा पुरवठा केल्यामुळे नागरी पुरवठा खाते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

याप्रकरणी खात्याच्या संचालकांनी कुठ्ठाळ्ळी व सासष्टी येथील गोदामातील धान्यसाठ्याची तपासणी केली व या किडलेल्या तांदूळप्रकरणी संबंधित गोदामप्रमुखांना चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

खात्याची अनेक गोदामे ही डागडुजीच्या अवस्थेत असतानाही त्याची अंमलबजावणी केलेली नाही. या घटनेनंतर खात्याने सर्व गोदामांतील धान्यसाठ्याची तपासणी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्वस्त धान्य दुकानांतून शिधापत्रिकाधारकांना अळ्या असलेल्या तांदळाचा पुरवठा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खात्याच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्या पाहणीत लोकांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले होते.

याची माहिती खात्याच्या प्रमुखांना दिल्यानंतर त्यांनी हा प्रकार गोदामातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास कसा आला नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला. संचालक गोपाळ पार्सेकर यांनी आज, बुधवारी सकाळी कुठ्ठाळ्ळी येथील खात्याच्या गोदामात जाऊन तांदळाच्या पोत्यांची तपासणी केली.

मात्र, एकाही पोत्यात अळी पडलेल्या किंवा ते सडलेल्या स्थितीत आढळले नाही. मात्र, तांदळात अळी पडेपर्यंत कर्मचाऱ्यांना कसे कळले नाही, याचे स्पष्टीकरण त्यांनी मागितले आहे. गेल्या वर्षी तूरडाळ तसेच साखर खराब झाल्याने या प्रकरणाची चौकशी दक्षता खात्यामार्फत सुरू आहे.

यासंदर्भात संचालक गोपाळ पार्सेकर म्हणाले की, सरकारने पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना शिधापत्रिका जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानधारकांना पूर्वीसारखा मोठ्या प्रमाणात धान्यसाठा उचलता येत नाही.

सडलेल्या तांदळाचा साठा दुकानधारकांना देण्यापूर्वी गोदामातील कर्मचाऱ्यांनी त्याची शहानिशा करणे गरजेचे होते. मात्र, गोदामात साठा मोठ्या प्रमाणात असल्याने त्याची तपासणी कऱणे शक्य होत नाही.

एखादे पोते खराब असले किंवा त्यामध्ये अळी किंवा कीड लागली असेल तर ते गोदामातून बदलून देण्यात येते.

सासष्टी तालुक्यातील काही रास्त भाव दुकानांमध्ये रेशनकार्ड धारकांना खराब तांदळाचा पुरवठा केल्याच्या बातमीने चिंतेचे वातावरण पसरले. यासंदर्भात संचालकांनी सांगितले की, गोदामात तांदळाचे एकही खराब पोते सापडलेले नाही.

ज्या तांदळाचा पुरवठा केला, त्यात कदाचित एक-दोन पोती खराब तांदूळ असू शकेल. आम्ही आमची जबाबदारी टाळत नाही. तांदूळ खराब होता, हेही नाकारत नाहीत. ज्या रेशनकार्ड धारकाला खराब तांदूळ मिळाला असेल, त्यांनी तो परत करून दर्जेदार तांदूळ न्यावा.

आम्ही तसा आदेश रास्त भाव दुकानदारांना दिला आहे, असेही संचालक पार्सेकर यांनी सांगितले.

नंतर चांगले तांदूळ दिले

मुरगावातील निरीक्षक सरिता मोरजकर यांनी दुकानधारकांना खराब तांदळाऐवजी त्याच्या बदल्यात दुसरा धान्यसाठा पुरवठा केला आहे. मात्र, हा तांदळाचा साठा केव्हाचा होता व तो खराब होऊ नये यासाठी गोदामातील कर्मचाऱ्यांनी आवश्‍यक ती सावधगिरी बाळगली होती का, याची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल मागवला आहे.

- गोपाळ पार्सेकर, संचालक, नागरी पुरवठा खाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Digital Arrest: TRAI, CBI अधिकारी असल्याचे भासवून गोमंतकीयांना धमकावले; उकळले 1.22 कोटी; कर्नाटक, गुजरातमधून संशयितांना अटक

Goa Land Bill: मोकाशे, आल्वारा, सरकारी जमिनीत घरमालकांना दिलासा! भू-महसूल कायदा दुरुस्ती विधेयक विधानसभेत मंजूर

Rashi Bhavishya 1 August 2025: गुंतवणुकीसाठी दिवस योग्य नाही,खर्चावर योग्य नियंत्रण आवश्यक; मित्रांकडून सहकार्य मिळेल

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT