Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

City & Town Planning Department: नगर नियोजनचा ड्राफ्ट्समन तुयेकर निलंबित, प्रकरणाची राणेंकडून दखल

लोकांकडून लाच घेणे, त्यांची सतावणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे

गोमन्तक डिजिटल टीम

City & Town Planning Department नगर व शहर नियोजन खात्यातील ग्रेड वन ड्राफ्ट्समन चंद्रशेखर तुयेकर (रा. तिसवाडी) यांच्यावर आज निलंबनाची कारवाई झाली. विविध प्रमाणपत्रे देण्यास लोकांकडून लाच घेणे, त्यांची सतावणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. चौकशीत दोषी आढळल्यास नोकरीतूनच बडतर्फ केले जाईल, असा इशारा नगरनियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिला.

तुयेकर हे लोकांना प्रमाणपत्र देण्यासाठी पैशांची मागणी करत असत. तसेच वारंवार हेलपाटे मारण्यास लावून सतावणूक करत असल्याच्या अनेक तक्रारी खात्याकडे आल्या होत्या. या गंभीर आरोपांमुळे त्यांना आज तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

त्यांच्याविरोधातील तक्रारींची चौकशी खात्याचे मुख्य निगर नियोजक जेम्स मॅथ्यू करत आहेत. चौकशी अहवालात आरोप सिद्ध झाल्यास त्यांना तत्काळ नोकरीतून बडतर्फ केले जाईल, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले.

राणेंकडून दखल

काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विविध खात्यांत कामचुकार, भ्रष्ट कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यावर नगर व शहर नियोजन खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे काहींनी मंत्री राणेंना कळविले.

त्यात संबंधित अधिकाऱ्याने केलेली सतावणूक व पैशांची मागणी याची माहिती देण्यात आल्याने त्याची गंभीर दखल घेऊन मंत्र्यांनी ही कारवाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Board HSSC Result: 12 वीचा निकाल जाहीर! 92.96% विद्यार्थी उत्तीर्ण, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Goa Accident: नाकेरी-बेतुल येथे भीषण अपघात; 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, भटक्या गुरांचा अडथळा ठरला जीवघेणा

KKR ला दुसरा 'मोठा' झटका! हर्षित राणानंतर आता 'हा' मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

Viral Video: 'डायपर'चा असाही वापर! कोल्ड-ड्रिंक थंड ठेवण्यासाठी तरुणाचा 'देसी जुगाड', पाहा कसं बनवलं घरगुती मिनी फ्रीज

पदार्पण असावं तर असं! 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणातच झळकावलं शतक, रचले दोन विश्वविक्रम Watch Video

SCROLL FOR NEXT