Land Grabbing Case:
Land Grabbing Case: Dainik Gomantak
गोवा

Comunidade: कोमुनिदाद परिषदेत नागरिकांना डावलले

दैनिक गोमन्तक

Comunidade: दोनापावला येथे कोमुनिदाद परिषद सुरू असताना या परिषदेस नागरिकांना डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ उपस्थितांनी सभागृहाच्या बाहेरील रस्त्यावर आंदोलन केले. यात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. दरम्यान, कोमुनिदादच्या जमिनी कोमुनिदादच्याच रहाव्यात, ही सरकारी जमीन नाही.

स्थानिकांची ती जमीन असून कोमुनिदादच्या जमिनीविषयी कायदे करतात, ते स्थानिकांशी चर्चा करून करणे आवश्‍यक आहे, अशी मागणी आपचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी केली.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अभिजीत प्रभुदेसाई म्हणाले, अनुसूचित जाती-जमातीतील जे लोक आहेत, ते खरे गावकार आहेत. मूळनिवासी आहेत, त्यांनी या कोमुनिदाद म्हणजेच गावकारी तयार केलेली आहे. या परिषदेत एकही गावकार नाही, याचा आम्ही निषेध करतो. ही जी परिषद आयोजित केली आहे, ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

अशी परिषद खरे तर बाराजणांच्या ठिकाणी व्हायला हवी होती. ज्या जागी सर्व कोमुनिदादी एकत्र येतात, सर्व समाजातील लोक त्यात महिलांचाही समावेश असतो, असे सर्वजण एकत्रित येऊन निर्णय घेतात, त्यांनाच अधिकार असतात. या परिषदेला जे आलेले आहेत, त्यात एका गावातील पाच-दहा कुटुंबाचे लोक कोमुनिदादचे हक्क आपल्याकडे घेऊन बसले आहेत, त्यांचा समावेश आहे.

आजपर्यंत ज्या गावकारी जमिनी घेतल्या गेलेल्या आहेत, त्या सर्व बेकायदेशीर आहेत. गावकार जमिनी या गावची, देवाच्या नावावर, गावाच्या नावावर किंवा सामाईक जमीन. सर्व कोमुनिदादींना एकत्रित बोलावून मांडावर म्हणजेच बाराजण ठिकाणी बसून निर्णय घेण्याचा अधिकार मिळावा, अशी आमची मागणी आहे. ॲड. गजेंद्र उसगावकर, प्रा. रामराव वाघ यांनीही आपले मत मांडले.

...तर राज्यातील शेती संपेल

आवेर्तान म्हणाले, कोमुनिदाद (गावकारी) जमीन पोर्तुगीज काळापासून आहे. सध्या कोमुनिदाद जमिनी राजकारण्यांकडून लुटण्याचा प्रकार सुरू आहे. कोमुनिदाद ही स्वायत्त संस्था आहे. ही राजकारणी मंडळी कोमुनिदाद संपविण्यासाठी पुढे सरलेली आहे. रेईश मागूस येथील ६० हजार चौ. मी. कोमुनिदाद जमीन विकसकाच्या घशात घातली आहे. राजकारणी आणि विकसक हे संगनमताने कोमुनिदाद जमिनी बळकावत आहेत. कोमुनिदाद जमीन सांभाळली नाही, तर शेती संपणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT