Garbage Dainik Gomantak
गोवा

Goa News : कचऱ्यामुळे नेवरावासीय त्रस्त; कठोर कारवाई करण्याची ग्रामसभेत मागणी

Goa News : प्लास्टिक आणि सुका कचरा जाळण्यास येत असल्याने याचा त्रास मुले आणि वृद्धांना होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : तिसवाडी, नेवरा पंचायतीच्या अखत्यारित सुका आणि ओला कचरा खुल्या जागेत किंवा रस्त्याच्या बाजूला फेकला जात असून यामुळे नेवरावासीय त्रस्त आहेत.

कचरा फेकणाऱ्या व्यक्तींना पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावेत, तसेच एखादा व्यक्ती सापडल्यास कठोर कारवाई करत त्याच्या घराची वीज आणि पाणी जोडणी कापण्यात यावी, अशी मागणी नेवरा पंचायतीच्या ग्रामसभेत नेवरावासियांनी केली.

प्लास्टिक आणि सुका कचरा जाळण्यास येत असल्याने याचा त्रास मुले आणि वृद्धांना होत आहे. नेवरा पंचायतीच्या अखत्यारित कचरा जाळताना कोणीही आढळल्यास त्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी. केवळ दंड न करत वारंवार कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

कचरा फेकणारे व्यक्ती परप्रांतीय असतात आणि कचरा फेकून ते पळ काढतात, असे उत्तर पंच सुनीता नाईक यांनी दिले. यावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पंचायतीला आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.

रात्रीच्या वेळी अनेक अनोळखी व्यक्ती फिरताना दिसतात, मात्र आगशी पोलिसांकडून गस्त घालण्यास संख्याबळ कमी आहे, असे कारण दिले जाते.

यावर ग्रामसभेत चर्चा झाली. येथे भाडेपट्टीवर राहत असलेले काहीजण रात्रीच्या वेळी बाहेर फिरताना दिसतात. त्यामुळे भाडेपट्टीवर राहणाऱ्यांची माहिती पोलिसांना दिली आहे की नाही याची शहनिशा होणे गरजेचे आहे, असा विषय ग्रामसभेत मांडला गेला.

रात्रीच्या वेळी काही अनोळखी व्यक्ती फिरतात, याची माहिती आगशी पोलिसांना दिली गेली आहे. परंतु गस्तीसाठी पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याचे सांगण्यात येते. आता देखील अनेक व्यक्ती गावांत आढळतात. अनोळखी व्यक्तीला पंचायतीची परवानगी घेतली आहे की नाही याचा पुरावा दिल्याशिवाय त्यांना घरात प्रवेश द्यायचा नाही.

-ॲड. होनारिना आरावजो, सरपंच, नेवरा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Satish Shah: सलग 55 एपिसोडमध्ये साकारल्या 55 भूमिका, सतीश शाहांचे निधन; हसऱ्या चेहऱ्याचा पडला पडदा

गोव्यात प्रथमच पार पडली वजन-माप खात्याच्या नियंत्रकांची राष्ट्रीय परिषद; CM सावंतांनी दिली ग्राहकांच्या हक्काचे जतन करण्याची हमी

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

आमदार दिलायला लोबोंचा भिंत बांधकामावर प्रत्युत्तर; आरोपांना दिले राजकीय हेतूचे वळण

SCROLL FOR NEXT