New Zuari Bridge  Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद; नव्या झुआरी पुलावर नागरिकांची गर्दी

पुलावर स्थानिक तसेच पर्यटकांची सेल्फी, फोटो काढण्यासाठी गर्दी

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्याला उत्सुकता लागून असलेल्या बहुचर्चित नव्या झुआरी पुलावर स्थानिक तसेच पर्यटकांची फोटो व सेल्फी काढण्यासाठी गर्दी उसळली होती. यावेळी स्थानिकांनी गिटारच्या साथीने गाणीही गायली. पुलाला आकर्षक अशी विद्युत रोषनाई करण्यात आली होती. शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवीन झुआरी पुल स्थानिक तसेच पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल. सर्वांनी नवीन झुआरी पुलावरुन नयनरम्य दृष्य पहावे असे आवाहन केले होते.

दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या या नवीन केबल स्टेट ब्रिजचे 29 डिसेंबर रोजी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. नवीन जुवारी पूल 25 ते 28 डिसेंबरपर्यंत फोटोग्राफीसाठी सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत जनतेसाठी खुला असेल आणि पूल 29 डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुला होईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर करताच आज रविवारी पहील्याच दिवशी स्थानिक तसेच पर्यटकांची गर्दी उसळली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT