Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: सायपे तळे शेतातील प्रस्तावित रस्त्याला नागरिकांचा विरोध

हे सर्वेक्षण प्रस्तावित रस्त्यासाठी असल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी त्यास विरोध दर्शविला आहे

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: नावेलीजवळील सायपे तळीच्या शेजारील शेतजमिनीचे जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण प्रस्तावित रस्त्यासाठी असल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी त्यास विरोध दर्शविला आहे.

काही नागरिकांच्या मते तळ्यासभोवतालची शेतजमीन रिअल इस्टेट कंपनीला हवी आहे, त्यामुळे प्रस्तावित रस्त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

जर या शेतजमिनीतून खरोखरच प्रस्तावित रस्त्याचा विचार असेल तर तो रद्द करावा, अशी मागणी स्थानिकांनी जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांना केली आहे.

या भागातील शेतकरी या शेतामध्ये भातपिकाच्या लागवडीसाठी प्रयत्नशील आहेत व आता या प्रस्तावित रस्त्यामुळे त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले जाणार असल्याची भीती त्यांना आहे.

काही शेतकऱ्यांनी भातपिकाची लागवड यापूर्वीच केलेली आहे. मात्र, आता आधुनिक मशिनरीचा वापर करून त्यांना पुढील काम करणे या सिंचन पाईपमुळे शक्य होत नसल्याचे अभियंत्याच्या लक्षात आणून दिले आहे.

जलस्त्रोत खात्याने यातील काही जमीन सिंचन प्रकल्पासाठी ताब्यात घेतली आहे. आता हा सिंचन प्रकल्प होत नसल्याने ही जागा आम्हाला परत द्यावी, अशी मागणीही शेतकरी करीत आहेत.

कित्येक वर्षांपासून या शेतजमिनीत भातपिकाची लागवड झालेली नाही. मात्र, आता फादर जॉर्ज क्वाद्रोस यांच्या मदतीने भातपिकासाठी स्थानिक शेतकरी प्रयत्नशील आहेत. जलस्त्रोत खात्याने या तळ्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी ४६ कोटी रुपयांची निविदा काढलेली आहे. शेतातून जो रस्ता प्रस्तावित केला आहे, त्यास आमचा विरोध आहे.

- जेम्स गोम्स, शेतकरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

VIDEO: 'ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर'! टीम इंडियाच्या विजयानंतर मोहसिन नक्वीची फजिती; भारतीय चाहत्यांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT