Mayem Mining Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Mining Case: मयेतील खाणविरोधी आंदोलन सरकारने चिरडले

Goa Mining Case: पोलिस बंदोबस्तात वाहतूक : गोवा फॉरवर्डच्या नेत्यासह सहाजणांना अटक-सुटका

दैनिक गोमन्तक

Goa Mining Case: बेकायदा खनिज वाहतुकीविरोधात मयेवासीयांनी एल्गार केला खरा; परंतु प्रशासनाने पोलिस बळाच्या जोरावर हे आंदोलन आज मोडून काढले. मयेतील संतप्त लोकांनी आज खनिज वाहतूक रोखून धरली. मात्र, डिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एका तासातच पोलिस बंदोबस्तात खनिज वाहतूक पुन्हा सुरू केली.

यावेळी खनिज वाहतुकीला विरोध करणारे गोवा फॉरवर्डचे सचिव संतोष सावंत यांच्यासह सहा आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, सायंकाळी त्यांना सोडण्यात आले. गेल्या सोमवारपासून (ता. ८) पैरा खाणीवरून ई-लिलावातील खनिजाची वाहतूक सुरू झाली आहे. पैराहून मये गावातील अंतर्गत रस्त्यावरून ही वाहतूक करण्यात येत आहे.

‘ब्ल्यूग्लोब’ या कंपनीने खनिज वाहतुकीचे कंत्राट घेतले आहे. एप्रिल २०२२ मध्ये मयेतील अंतर्गत रस्त्याने खनिज वाहतूक करण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तरीदेखील मयेत अंतर्गत रस्त्याने खनिज वाहतूक करण्यात येत आहे.

अंतर्गत रस्त्याने खनिज वाहतूक नकोच, या मागणीवर ठाम असलेले संतप्त मयेवासीय आज (शनिवारी) पुन्हा रस्त्यावर उतरले. आज सकाळी या आंदोलनकर्त्यांनी केळबायवाडा येथे खनिज वाहतूक करणारे काही ट्रक अडविले.

परंतु खनिज वाहतूक रोखल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला. तसेच डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांच्यासह मामलेदार अभिजीत गावकर, श्रीपाद माजिक, पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर आंदोलनस्थळी दाखल झाले.

उद्या उग्र आंदोलन

प्रशासनाने आज जरी पोलिस बळावर आंदोलन चिरडले असले, तरी आम्ही न्यायालयाच्या आदेशाशी सहमत आहोत.

मये गावातून खनिज वाहतूक होऊ देणार नाही. उद्या सोमवारी सर्व ताकदीनिशी यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्‍यात आला.

पोलिस बळाने विरोध मोडीत

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात खनिज वाहतूक सुरू होताच आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर मधेच उभे राहून ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गोवा फॉरवर्डचे सचिव तथा स्थानिक नेते संतोष सावंत यांच्यासह सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात अजित सावंत, नागेश नाईक, बाबूसो कारबोटकर, श्रीराम साळगावकर आणि मालवणकर यांचा समावेश होता. त्यांची सायंकाळी मुक्तता करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT