Suchna Seth: ‘एआय’ कंपनीची सीईओ सूचना सेठ हिने आपल्या चारवर्षीय मुलाची हत्या केल्याप्रकरणी तिचा पती व्यंकटरमण यांनी कळंगुट पोलिसांना जबाब दिला. यावेळी त्याने आपले म्हणणे वकिलांमार्फत मांडले. त्यांच्या वतीने अॅड. अझर मीर पत्रकारांना म्हणाले की, सूचनाला रागच होता, तर तो व्यंकटरमणवर काढायचा होता.
चिन्मयचा जीव घेऊन कुणाचे बरे झाले! त्यामुळे आता आम्हाला कुठल्याच न्यायाची अपेक्षा नाही. असा दावा अॅड. मीर यांनी केला. संशयित सूचना सेठ हिचा पती व्यंकटरामण हे आज शनिवारी (ता. १३) दुपारी कळंगुट पोलिस स्थानकात दाखल झाले. स्थानिक पोलिसांनी त्यांना समन्स जारी केले होते. त्यानुसार, व्यंकटरमण यांनी आज पोलिसांना सूचना व त्यांच्या नात्यातील चढउताराबाबत माहिती दिली.
पोलिसांनी आज सूचना व व्यंकटरमण यांना एकत्र खोलीत बसून एकसाथ जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला. यावेळीही दोघांमध्ये पुन्हा खटके उडाले. चिन्मयच्या मृत्यूसाठी दोघेही एकमेकांना दोष द्यायला लागले. जवळपास २० मिनिटे हे दोघे पोलिसांसमोर एकत्र होते, असे पोलिससूत्रांनी सांगितले.
व्यंकरमण व सूचना यांच्यात बंगळुरु फॅमिली कोर्टामध्ये मुलाच्या (चिन्मय) कस्टडीबाबत न्यायालयीन लढाई सुरू होती. त्यानुसार, कोर्टाने व्यंकटरमण यांना मुलगा चिन्मय याला दर रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भेटण्याची मुभा दिली होती. हा आदेश नोव्हेंबर २०२३ मध्ये कोर्टाने दिलेला. त्यानंतर सूचना हिने बाप-मुलास सुरूवातीचे तीन रविवार भेटण्यास दिले. त्यानंतर, सलग पुढील चार रविवार सूचना हिने बाप-लेकाची भेट होऊ दिली नाही आणि पाचव्या रविवारी मुलाच्या हत्येची घटना घडली, अशी माहिती व्यकंटरमण यांनी पोलिसांसमोर दिली.
व्यंकटरमण हे सूचना सेठ हिचा छळ करायचे अशा काही बातम्या समोर येताहेत, असे विचारले असता अॅड. अझर मीर म्हणाले की, या बातम्यांमध्ये तथ्य नाही. तसेच, दोघांमध्ये नक्की काय चालले होते ते मला माहिती नाही आणि असे काही असते तर सूचनाने चिन्मयला का ठार मारले? मुळात चिन्मय हा मुलगा सूचनाचा छळ करत होता का?
राग काढायचाच होता तर तो व्यंकटरमण यांच्यावर काढाला पाहिजे होता! त्या निष्पाप चिमुकल्याचा या साऱ्यात काय दोष होता, असे म्हणत अॅड. मीर यांनी व्यंकटरमण यांची बाजू मांडली.
सध्या व्यंकटरमण हे चिन्मयच्या मृत्यूने
पूर्णतः खचले असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुळात चिन्मयच्या खुनाचा आरोप असणारी व्यक्ती ही पोलिस कोठडीत आहे, तर दुसरी व्यक्ती (व्यंकटरमण) यांनी चिन्मयच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यामुळे व्यंकटरमण यांची आपबीत्ती प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे.
अकारण, त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप किंवा ते छळ करत होते, हे म्हणणे अयोग्य ठरेल, असेही अॅड. मीर यांनी सांगत व्यंकटरमण यांच्याकडून सूचना सेठ हिच्यावर होणारे छळाचे आरोप खोडून काढले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.