Baga Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Beaches: समुद्र किनाऱ्यांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी ग्रामपंचायती सरसावल्या; आता पर्यटन पोलिसांची फौज...

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्याकडे केली मागणी

दैनिक गोमंतक

सासष्टी: गोवा राज्यात पर्यटन हंगाम सुरु असल्याने देश व विदेशातील पर्यटक गोव्यात येत आहेत. हे पर्यटक जास्त करुन किनारी भागात व समुद्र किनाऱ्यांवर फिरण्यास पसंती देताना दिसतात. या पार्श्वभूमीवर किनाऱ्यांवर अनसुचीत गैरप्रकार होऊ नये म्हणुन केळशी व कोलवा सरपंचांनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्याकडे समुद्र किनाऱ्यांवर पोलिस कुमक वाढविण्याची तसेच खास पर्यटन पोलिसांच्या नियुक्तीची मागणी केली आहे.

(Citizens have demanded to increase the number of police on the beach in the state of Goa)

पर्यटन पोलिसांची मागणी

पर्यटकांची संख्या दररोज वाढत असल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठीही पर्यटन पोलिसांची मागणीही करण्यात आली आहे. देशांच्या अनेक राज्यांमध्ये पर्यटक पोलिसांची व्यवस्था करण्यात आली असुन गोव्यातही ती व्हावी असे मत या सरपंचांनी व्यक्त केले आहे.

केळशीचे सरपंच डिक्सन वाझ व कोलवा सरपंच सुझी फेर्नांडीस यानी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची भेट घेऊन वरील मागणी केली आहे. दर्जेदार पर्यटक समुद्र किनाऱ्यांवर यासाठी पर्यटन खात्यातर्फे चांगले कार्यक्रम किनारी भागात आयोजित करावे अशी मागणीही केली आहे.

किनारी भागातील नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे

याव्यतिरिक्त किनारी भागातील नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यात किनाऱ्यांची स्वच्छता, खंडीत वीज प्रवाह, परप्रांतीय फेरीवाले यांचा समावेश आहे. या समस्यांबद्दल व त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी आम्ही पर्यटन मंत्र्यांची भेट घेतली असे डिक्सन वाझ यानी सांगितले. आम्ही या समस्या बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश यांच्या कानावरही घातल्या आहेत.

दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांवरही राज्य सरकारने लक्ष ठेवावे

राज्य सरकाराचे जास्त लक्ष उत्तर गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर केंद्रीत आहे. काही प्रमाणात दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांवरही राज्य सरकारने लक्ष ठेवावे असे आमचे म्हणणे आहे, असेही डिक्सन वाझ यानी सांगितले. परप्रांतीय फेरीवाल्यांचा त्रास जास्त जाणवू लागला आहे व स्थानिक पोलिस काहीच करु शकत नाही. त्यामुळे पर्यटक पोलिसांची मागणी आम्ही केली आहे असे डिक्सन वाझ यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT