Citizens are angry over the power issue of Pernem residents
Citizens are angry over the power issue of Pernem residents Dainik Gomantak
गोवा

पेडणेवासीयांचा वाढतोय ‘पारा’ वीज खात्‍याला इशारा

दैनिक गोमन्तक

मोरजी : पेडणे तालुक्यात गेल्‍या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. सध्‍या उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे. गर्मीमुळे लोक हैराण झाले आहेत. आणि अशा वेळी दुपारी तसेच रात्रीच्‍या वेळी अचानक वीज गायब होत असल्‍यामुळे लोकांचा ‘पारा’ वाढू लागला आहे. ‘आमच्‍या संयमाचा अंत पाहू नका’ अशा शब्‍दांत त्‍यांनी वीज खात्‍याला इशारा दिला आहे.

खंडित वीजपुरवठ्याचा परिणाम चांदेल जलप्रकल्पावर होत असतो. वीज नाही म्हणजे पाणी नाही आणि नळाला पाणी नसल्यामुळे पाणी (water) विभागाच्‍या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना लोकांचा रोष पत्करावा लागतो. वीज खाते अधूनमधून हक्काने शटडाऊन करून वीजदुरुस्तीची कामे हाती घेते. मान्सूनपूर्व कामे करत असतानाही कधीकधी अर्धा दिवस वीज बंद करून नागरिकांना (Citizen) हैराण करून सोडले जाते. यासंदर्भात पूर्वसूचना दिली तरीही काहींना त्याची कल्पना नसते. त्यामुळे अचानक वीज (Electricity) गेल्यावर त्‍यांची तारांबळ उडते.

पेडणे (Pernem) तालुक्याचा विचार केला तर चांदेल जलप्रकल्प पूर्णपणे विजेवर अवलंबून आहे. दोन तास जरी वीज नसली तरी किमान बारा तास पाणी नसते. वीज नाही तर पाणी नाही, अशी स्थिती पेडणेवासीयांची झाली आहे. नवीन सरकार शिमगोत्सवानंतर अस्तित्वात येणार आहे. सध्या पेडणे तालुक्यातून दोन नवनिर्वाचित आमदार (MLA) निवडून आलेले आहेत. त्यातील पेडणे मतदारसंघात भाजपचे (BJP) प्रवीण आर्लेकर आणि मांद्रे (Mandrem) मतदारसंघात मगोचे जीत आरोलकर यांचा समावेश आहे. या दोन्ही लोकप्रतिनिधींना वीज आणि पाणी या पेडणेवासीयांना भेडसावणाऱ्या दोन प्रमुख समस्‍या मतभेद विसरून सोडवाव्‍यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT